Posts

Showing posts from July, 2026

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘स्टार्टअप्स अँड एंटरप्रेन्युअरशिप’ कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे

Image
‘ आयडिया टू ॲक्शन’चा दिला मंत्र ; प्रा. प्रसाद तिगलपल्ली यांच्या मार्गदर्शनातून स्टार्टअप उभारणी , उद्योजकीय मानसिकता व फंडिंगच्या संधींचे विद्यार्थ्यांना धडे जळगाव, ता. ३१ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या   डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंटतर्फे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल ( IIC) व इनक्युबेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच JITO यूथ जळगाव यांच्या सहयोगाने ‘स्टार्टअप्स अँड एंटरप्रेन्युअरशिप’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘लर्न. प्लॅन. लॉन्च. सक्सीड.’ या संकल्पनेवर आधारित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्टार्टअपची संकल्पना , व्यवसायाची कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणणे , उद्योजकीय मानसिकता , शाश्वत स्टार्टअप उभारणी तसेच फंडिंगच्या विविध संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की , आजच्या वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक जगात विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक करिअरच्या संधींचा विचार न करता आपल्या कल्पना , कौशल्ये आणि ज्ञ...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘एनईपी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन’मधून नव्या शैक्षणिक पर्वाचा जागर

Image
‘ मेरी एनईपी की समझ’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते प्राध्यापकांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘एनईपी २०२० इन प्रॅक्टिस’ पुस्तकाचे प्रकाशन जळगाव , ता. २९ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०च्या माध्यमातून भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाचा आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा जागर करण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात ‘एनईपी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन – २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या विविध पैलूंवर आपले विचार प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल उपस्थित होत्या. यानंतर डॉ. बिपासा बी. पात्रा यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करत कार्यक्र...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ‘पीसीओएस व संतुलित आहारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Image
६५० विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी ; ‘ हेल्दी माइंड • हेल्दी बॉडी • हेल्दी फ्युचर’— संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांचा संदेश जळगाव , ता. २८ , : विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या रायसोनी रोटरॅक्ट क्लब यांच्या वतीने पिंक हॅट क्लब व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय , जळगाव यांच्या सहकार्याने ‘फ्री हेल्थ चेक-अप कॅम्प’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील अभियांत्रिकी व मॅनेजमेंट विभागाच्या सुमारे ६५० विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन देत त्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल उपस्थित होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय , जळगाव येथील प्रसूतीतंत्र व स्त्रीरोग विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. प्रतीक्षा राठोड व सहाय्यक प्रा. डॉ. सोनाली फराटे उपस्थित होत्या. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष...

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जी. एच. रायसोनी महाविद्यालयात भक्तिमय उत्साह; ‘आषाढी स्वादोत्सवा’सह वारकरी परंपरेचा जागर

Image
‘ परंपरेची चव , आनंदाचा ठेवा’ उपक्रमातून संस्कृती , परंपरा आणि आरोग्यदायी आहाराचा संदेश ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव , दि. २४ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विविध उपक्रमांचे आयोजन करून आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विभागीय सांस्कृतिक क्लब आणि इन्स्टिट्यूट्स बेकर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थ सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स विभागाच्या सांस्कृतिक क्लबतर्फे ‘आषाढी एकादशी उत्सव – पंढरीच्या वारीचा उत्सव’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत , तर विद्यार्थ्यांनी धोतर-कुर्ता परिधान करून उत्साहात सहभाग नोंदविला. पंढरीच्या वारीची भक्तिमय परंपरा , वारकरी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी असलेले तिचे अतूट नाते विद्यार्थ्यांनी ...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ४२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड; आकर्षक पॅकेजसह करिअरची सुवर्णसंधी

Image
एमबीए , बीबीए , कॉम्प्युटर व सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची लर्न फ्लू , एक्सेलआर , ग्लोबल बीआयएफएस आणि ग्लोबल व्ह्यू या आघाडीच्या कंपन्यांमध्ये निवड ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले अभिनंदन जळगाव , ता. २० : स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्याल्यातील      विद्यार्थ्यांनी जून आणि जुलै महिन्यात झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल ४२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. आकर्षक वेतन पॅकेजसह विद्यार्थ्यांना करिअरची नवी दिशा मिळाल्याने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच उद्योगाभिमुख प्रशिक्षण , व्यक्तिमत्त्व विकास , संवादकौशल्य , सॉफ्ट स्किल्स , मुलाखत तंत्र आणि करिअर मार्गदर्शन दिले जाते. याच सर्वांगीण प्रशिक्षणाचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. लर्न फ्लू या कंपनीने एमबीए व बीबीए विद्या...

'एक वृक्ष – एक जीवन' उपक्रमांतर्गत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात वृक्षारोपण

Image
दिव्य मराठीच्या पर्यावरण जनजागृती अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांचे कौतुक जळगाव, ता. १७ :   दिव्य मराठी वृत्तपत्राच्या ' एक वृक्ष – एक जीवन ' या पर्यावरण संवर्धन अभियानांतर्गत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल , सावखेडा शिवार , जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका क्रीस्टाबेल परेरा तसेच ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर अजय नोहा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व , जैवविविधतेचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे संरक्षण करत नाहीत , तर शुद्ध हवा , पाणी आणि समृद्ध जैवविविधतेचे आधारस्तंभ असल्याचे...

युवा कौशल्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचा ‘टीच वन, इन्स्पायर वन’ उपक्रम

Image
समाजाभिमुख उपक्रमातून रोटरॅक्ट क्लबच्या संयुक्त विद्यमाने शहरातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना इंग्रजी संवादकौशल्य , आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन जळगाव , दि. १६ : आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनानिमित्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालया च्या रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी जळगावतर्फे रोटरॅक्ट क्लब ऑफ युनायटेड रांची यांच्या सहकार्याने ‘टीच वन , इन्स्पायर वन’ या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन राज माध्यमिक विद्यालय , मेहरूण , जळगाव येथे करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी संवादकौशल्य विकसित करणे , सार्वजनिकरीत्या आत्मविश्वासाने बोलण्याची क्षमता वाढविणे , विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच कौशल्याधारित शिक्षणाची गोडी निर्माण करणे हा होता. कार्यक्रमात महाविध्यालयातील विध्यार्थी स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांसोबत विविध संवादात्मक उपक्रम , इंग्रजी संभाषणाचा सराव , गटचर्चा , प्रश्नोत्तरे आणि प्रेरणादायी कृतींचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत इंग्रजीत स...