जी. एच. रायसोनी महाविध्यालयात ३ मे रोजी रंगणार ‘ओपन पेंटिंग स्पर्धा’
रायसोनी एज्युकेशनचा उपक्रम ; ‘ नेचर’ व ‘ट्रेडिशन’ या थीमवर आधारित स्पर्धा , सर्व वयोगटांसाठी संधी आणि आकर्षक रोख पारितोषिके जळगाव , ता, २८ : जी. एच. रायसोनी एज्युकेशनतर्फे रविवार , ३ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ‘थीम-आधारित ओपन पेंटिंग स्पर्धा’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जळगाव येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात होणार असून सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी स्पर्धकांना ‘ नेचर अराउंड अस’ किंवा ‘ द रूट्स ऑफ ट्रेडिशन’ या विषयांवर आधारित चित्र सादर करायचे आहे. पारंपरिक स्पर्धांपेक्षा ही स्पर्धा कल्पकता , विचारांची मांडणी आणि स्वतंत्र अभिव्यक्ती यांना प्रोत्साहन देणारी आहे. स्पर्धेत तीन वयोगट ठेवण्यात आले असून ८ ते १३ वर्षे , १३ ते २१ वर्षे आणि २१ वर्षांवरील स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक गटासाठी अनुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी ₹ ३००० ते ₹ ७००० पर्यंत रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक गटात दोन प्रोत्साहनपर पारितोषिकेही दिली जाणार आहेत. स्...