Posts

Showing posts from May, 2026

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव

Image
  विशेष लेख: नवे तंत्रज्ञान , नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण प्रा. डॉ. संजय शेखावत अकॅडमिक डीन जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय , जळगाव आज जग झपाट्याने बदलत आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी तंत्रज्ञान आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence), मशीन लर्निंग , रोबोटिक्स , डेटा सायन्स , इंटरनेट ऑफ थिंग्ज ( IoT), स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि स्वयंचलन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्योगविश्वाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. काही वर्षांपूर्वी केवळ भविष्यातील कल्पना वाटणाऱ्या गोष्टी आज उद्योगांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. अशा वेगाने बदलणाऱ्या काळात शिक्षण व्यवस्थेलाही नव्या वास्तवाशी जुळवून घेणे अपरिहार्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ( NEP-2020) कडे महत्त्वाच्या बदलाच्या दृष्टीने पाहिले जाते. या धोरणामध्ये शिक्षण अधिक लवचिक , कौशल्याधारित आणि बहुविषयक करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ एका विषयाच्या चौकटीत मर्यादित न राहता विविध शाखांमधील ज्ञान आत्मसात ...

शहरात रायसोनी महाविद्यालयातर्फे आणखी १० वॉटर कुलर; पहिले लोकार्पण वाहतूक पोलीस कार्यालयात

Image
यापूर्वी १५ ठिकाणी यशस्वी उपक्रमानंतर रायसोनी फाऊंडेशनचा समाजोपयोगी विस्तार ; नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा अधिक बळकट जळगाव , ता, २३ :   शहरातील शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय हे विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे सातत्याने चर्चेत राहिले आहे. यापूर्वी रायसोनी फाऊंडेशनतर्फे जळगाव शहरातील विविध सार्वजनिक व शैक्षणिक ठिकाणी १५ अत्याधुनिक वॉटर कुलर बसविण्यात आले होते. या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता शहरातील विविध भागांत आणखी १० वॉटर कुलर बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असून त्यातील पहिले वॉटर कुलर जळगाव शहर वाहतूक पोलीस कार्यालयात बसविण्यात आले आहे. या वॉटर कुलरचे लोकार्पण शहर वाहतूक पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल उपस्थित होत्या. तसेच युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बोलतान...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात पाच दिवसीय ‘एजेंटिक एआय’ सर्टिफिकेट कोर्सला उत्साहात प्रारंभ

Image
एआयच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव ; एजेंटिक एआय , एलएलएम आणि इंडस्ट्री-ओरिएंटेड स्किल्सचे प्रशिक्षण जळगाव , ता. २१ :जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील कॉम्प्युटर अँप्लिकेशन्स विभाग , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग तसेच करिअर गाईडन्स अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय ‘एजेंटिक एआय प्रोग्राम’ या विशेष सर्टिफिकेट कोर्सला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आधुनिक घडामोडी , एआय एजंट्सची निर्मिती आणि प्रत्यक्ष वापर याविषयी विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्टिफिकेट कोर्सचे उद्घाटन जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि विशेषतः एजेंटिक एआय या संकल्पनांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील किंवा सैद्धांतिक ज्ञानावर अवलंबून न राहता आधुन...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

Image
पारंपरिक चित्रशैलींना आधुनिकतेची आकर्षक जोड ; एकाच छताखाली असंख्य विद्यार्थ्यांनी साकारल्या देखण्या कलाकृती , राशी पाटीलच्या जिद्दीने वेधले लक्ष ; मान्यवरांचे मार्गदर्शन , विजेत्यांना ₹ ३७ , ००० ची रोख पारितोषिके जळगाव , ता. १७ मे : जी. एच. रायसोनी एज्युकेशनतर्फे आयोजित ‘थीम-आधारित ओपन पेंटिंग स्पर्धे’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात दि. १७ मे रोजी स्पर्धेचे पुन्हा आयोजन उत्साहात करण्यात आले. यावेळी स्पर्धकांसाठी “ फ्युजन थीम (एनी फॉर्म ऑफ ट्रेडिशनल पेंटिंग सच ॲज फड , वारली , मधुबनी इत्यादी विथ फ्युजन ऑफ कंटेम्पररी फॉर्म)”हा विशेष विषय देण्यात आला होता. सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आकर्षक कलाकृती साकारल्या. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वारली , मधुबनी , फड यांसारख्या पारंपरिक चित्रशैलींना आधुनिक संकल्पनांची जोड देत कल्पनाशक्ती , सर्जनशीलता आणि सामाजिक भान यांचे प्रभावी दर्शन घडवले. विविध विषयांवरील चित्रांमधून संस्कृती , परंपरा आणि आधुनिक ज...

हॅकाथॉन स्पर्धेत जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा “प्रथम” क्रमांक

Image
‘ एआय-बेस्ड स्मार्ट हेल्थकेअर अँड एसओएस इमर्जन्सी सिस्टम’ प्रकल्पाची चमक ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक जळगाव, ता. १६ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हॅकाथॉन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या संघाला रु. १५ , ०००/- चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेमध्ये आरोग्यसेवा, कृषी , स्मार्ट सिटी आणि शिक्षण या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये एकूण १० स्पर्धात्मक संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. यामध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवा क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावत आपली तांत्रिक गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सिद्ध केला. या उल्लेखनीय यशाबद्दल जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी ...