शहरात रायसोनी महाविद्यालयातर्फे आणखी १० वॉटर कुलर; पहिले लोकार्पण वाहतूक पोलीस कार्यालयात
यापूर्वी १५ ठिकाणी यशस्वी उपक्रमानंतर रायसोनी फाऊंडेशनचा समाजोपयोगी विस्तार; नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा अधिक बळकट
जळगाव, ता, २३ : शहरातील शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे
जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय हे विविध
समाजोपयोगी उपक्रमांमुळे सातत्याने चर्चेत राहिले आहे. यापूर्वी रायसोनी
फाऊंडेशनतर्फे जळगाव शहरातील विविध सार्वजनिक व शैक्षणिक ठिकाणी १५ अत्याधुनिक
वॉटर कुलर बसविण्यात आले होते. या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर
आता शहरातील विविध भागांत आणखी १० वॉटर कुलर बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात
आली असून त्यातील पहिले वॉटर कुलर जळगाव शहर वाहतूक पोलीस कार्यालयात बसविण्यात आले
आहे.
या वॉटर कुलरचे लोकार्पण शहर वाहतूक पोलीस कार्यालयाचे पोलीस
निरीक्षक श्री. संजय गायकवाड यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल उपस्थित होत्या. तसेच युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया यांची
प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीवर प्रकाश टाकत सांगितले की, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट हे केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे केंद्र नसून समाजातील गरजा ओळखून लोकहिताचे उपक्रम राबविणारी संस्था आहे. रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासोबतच सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. ही गरज लक्षात घेऊन शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी वॉटर कुलर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापूर्वी १५ ठिकाणी यशस्वीपणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता त्याच उपक्रमाचा विस्तार म्हणून आणखी १० वॉटर कुलर शहरात बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड यांनी जी. एच.
रायसोनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, वाहतूक पोलीस कार्याल यात दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा
असते. विशेषतः उन्हाळ्यात स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणे ही
अत्यंत गरजेची बाब आहे. रायसोनी फाऊंडेशनने सामाजिक जाणिवेतून केलेला हा उपक्रम
निश्चितच नागरिक व पोलीस कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी
नमूद केले.
या उपक्रमाच्या समन्वयासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज
शांताराम बडगुजर यांनी विशेष सहकार्य केले. तसेच या लोकार्पण सोहळ्यास अनिल बडगुजर,
दीपक चौधरी, शेखर जोशी, ललिता कोळी, शैला धनगर आदींची उपस्थिती होती.
रायसोनी फाऊंडेशनतर्फे शहरातील विविध भागांत टप्प्याटप्प्याने उर्वरित वॉटर कुलरही बसविण्यात येणार असून नागरिक, विद्यार्थी, प्रवासी व विविध कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
▪️ जळगाव शहरातील या १५ ठिकाणी यापूर्वी
बसविण्यात आले “वॉटर कुलर”
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या रायसोनी फाऊंडेशनतर्फे जळगाव
शहरातील विविध सार्वजनिक, शैक्षणिक
व समाजोपयोगी ठिकाणी यापूर्वी एकूण १५ अत्याधुनिक वॉटर कुलर बसविण्यात आले आहेत.
त्यामध्ये समाज कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी
कार्यालय, तहसील
कार्यालय, नवीन
बस स्थानक, बालसुधारगृह,
लुंकड कन्या शाळा
(गणेश कॉलनी), संत
ज्ञानेश्वर स्कूल (रामेश्वर कॉलनी), ब्राह्मण सभा मंगल कार्यालय, उडान मतिमंद स्कूल (पाच नंबर शाळा,
मनपा), श्री स्वामी समर्थ केंद्र (गणपती नगर),
श्रीमती आनंदीबाई
देशमुख बालक मंदिर शाळा (नवी पेठ), जिजामाता
माध्यमिक विद्यालय (हरिविठ्ठल नगर परिसर), सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय (शिरसोली पी.बी.),
माजी सैनिकांचे
मुलांचे वसतिगृह तसेच हनुमान मंदिर (माजी सैनिक सोसायटी, मोहाडी रोड) या ठिकाणांचा समावेश आहे.
▪️ शहरात आणखी १० नवीन वॉटर कुलर स्थापनेचे
काम सुरू
रायसोनी फाऊंडेशनतर्फे शहरातील विविध भागांत आणखी १०
अत्याधुनिक वॉटर कुलर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यातील पहिले वॉटर
कुलर जळगाव शहर वाहतूक पोलीस कार्यालयात व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात
लोकार्पित करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात श्री राम समर्थ बैठक हॉल (स्वामी समर्थ
इंद्रनील सोसायटी, पिंप्राळा
परिसर), श्री
दत्त मंदिर (संभाजी नगर), श्री
संत गजानन महाराज मंदिर (रायसोनी नगर), अपंग सेवा मंडळ मूकबधिर विद्यालय (नवी पेठ), श्री साई मंदिर (शिव कॉलनी), दत्त मंदिर (गणेश कॉलनी) आदी ठिकाणी
वॉटर कुलर बसविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे शहरातील नागरिक, विद्यार्थी, प्रवासी तसेच विविध धार्मिक व सार्वजनिक
ठिकाणी येणाऱ्या भाविकांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार
आहे.


.jpeg)


Comments
Post a Comment