Posts

Showing posts from January, 2026

क्लासरूममधून थेट बाजारात : ‘विक्रीतून व्यवस्थापन’ शिकण्यासाठी रायसोनीचे २०० विद्यार्थी रस्त्यावर

Image
तेजी हो या मंदी , खूब चलेगी ‘मंडी’ –रायसोनीच्या ‘मंडी - २०२६’ या उपक्रमाचे शहरभर कौतुक ; मार्केटमध्ये उतरली तरुण ऊर्जा जळगाव , ता. ३० : विद्यार्थ्यांना थिअरी मीट्स प्रॅक्टिस या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट , जळगाव येथे “रायसोनी मंडी २०२६” चे यशस्वी आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात एमबीएच्या २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी क्लासरूमच्या बाहेर पडत थेट स्ट्रीटवर जाऊन प्रत्यक्ष प्रॉडक्ट सेलिंगचा अनुभव घेतला. “लर्निंग बाय सेलिंग” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी टॉईज व इतर वस्तूंचे मार्केटिंग केले. या विक्रीतून मिळालेला प्रॉफिट अंडरप्रिव्हिलेज्ड चिल्ड्रनच्या एज्युकेशनसाठी कार्य करणाऱ्या एका एनजीओला डोनेट करण्यात येणार असून , शिक्षणासोबत सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जपण्याचा हा उपक्रम ठरला. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रॉडक्ट ट्रेनिंग प्रोग्रामचे उद्घाटन स्व. ग्यानचंदजी व सदाबाईजी रायसो...

एआय व नवतंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे कौशल्य विकासासाठी ‘पिनॅकल’सारखे महोत्सव आवश्यक : सायबर पोलीस श्री. मिर्झा

Image
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘पिनॅकल २०२६’ या राष्ट्रीय आयटी महोत्सवाचे दोन दिवसीय आयोजन ; विविध महाविद्यालयांतील १२०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव , ता. २९ : आज पाचव्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली असून कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI), मशीन लर्निंग , ब्लॉकचेन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे , तर क्रिएटिव्हिटी , क्रिटिकल थिंकिंग , इनोव्हेशन आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होणे अत्यावश्यक आहे. ‘पिनॅकल’सारखे राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य , आत्मविश्वास आणि व्यावसायिक तयारी वाढविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतात , असे प्रतिपादन जळगाव सायबर पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी केले. ते जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट , जळगाव येथे डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विभागाच्या वतीने आयोजित ‘पिनॅकल २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील आयटी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हा महोत्सव २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सायबर ...