जी. एच. रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
तंबाखू , मद्य व अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा निर्धार ; संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांचे विद्यार्थ्यांना निरोगी व जबाबदार जीवनाचा संदेश जळगाव , ता. २६ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तंबाखू , मद्य आणि विविध अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक , मानसिक , सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प करत व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यावेळी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की , " तरुणाई ही देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवून निरोगी , शिस्तबद्ध आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा संकल्प करावा. व्यसन हे केवळ व्यक्तीचे नव्हे , तर संपूर्ण कुट...