जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा : सरदार पटेलांना अभिवादन
“ Sardar @ 150” उपक्रमांतर्गत ‘एक भारत – आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेने विविध उपक्रमांचे आयोजन जळगाव , ता. ३१ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना ( NSS) विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वर्षीचा कार्यक्रम “ Sardar @ 150 – Unity March (Ek Bharat, Aatmanirbhar Bharat)” या थीमनुसार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. यानंतर त्यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना सांगितले की , “ देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. त्यांच्या राष्ट्रनिष्ठा , कणखर निर्णयक्षमता आणि दूरदृष्टीमुळे देशाचे एकत्रीकरण शक्य झाले. त्यांनी दिलेला ‘एक भारत , मजबूत भारत’ हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असून तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे.” त्या पुढे...