Posts

Showing posts from December, 2025

संविधान सदनात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा आवाज – रायसोनीची अक्षया दानी

Image
अटल बिहारी वाजपेयी व पंडित मदन मोहन मालवीय जयंतीनिमित्त राष्ट्रीय मंचावर रायसोनी महाविद्यालयाचा अभिमानास्पद सहभाग ; महाविध्यालयात घडले नेतृत्व , संसदेत मिळाला गौरव जळगाव, ता. २९ : भारत रत्न माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील संसद भवनातील संविधान सदनात , संसद सचिवालय , लोकसभा अध्यक्ष कार्यालय तसेच भारत सरकारच्या Ministry of Youth Affairs & Sports यांच्या संयुक्त सहभागातून एका भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात देशभरातील ‘माय भारत’ या पोर्टलअंतर्गत निवड करण्यात आलेल्या ३६ तरुणांनी सहभाग नोंदवून आपल्या विचारांचे प्रभावी मांडणी केली. या राष्ट्रीय स्तरावरील गौरवशाली मंचावर जळगाव येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या नामांकित स्वायत्त महाविद्यालयाची विद्यार्थिनी अक्षया दानी हिने संसदेत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जीवनकार्य व राष्ट्रउभारणीतील योगदानावर तीन मिनिटांचे सर्वोत्कृष्ट आणि प्रभावी भाषण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशे...

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे

Image
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण ; प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन   जळगाव , ता. २९   : येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात “उमंग–२०२५” या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्या हस्ते फीत कापून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी सांगितले की , महाविद्यालयीन जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष महत्त्व आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांचा मानसिक , बौद्धिक व शारीरिक विकास घडून येतो. आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य असून शिक्षणासोबतच कला , क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात संधी मिळाल्यास ते सुदृढ नागरिक घडतील. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देऊन उत्तम नागरिक घडविणे हे शिक्षकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमांमध्...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “नाताळ” सण उत्साहात साजरा

Image
विद्यार्थ्यांच्या नाटिका , सांताक्लॉजची धमाल ; येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा ठरला आकर्षण जळगाव , ता. २४  : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नाताळ सण (ख्रिसमस) मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत नाताळचा आनंद द्विगुणित केला. कार्यक्रमाची सुरुवात स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सांताक्लॉजचे मुखवटे व खाऊचे वाटप करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभू येशूच्या जीवनावर आधारित भावस्पर्शी नाटिका सादर केली. नाटिकेमधून प्रेम , त्याग , सेवा व मानवतेचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी विद्यार्थ्यांना नाताळ सणाचे महत्त्व तसेच प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जीवनातील शिकवणी याबाबत मार्गदर्शन केले. सांताक्लॉजची वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी ‘जिंगल बेल’ या गाण्यावर ताल धरत सर्वांची मने जिंकली. यावेळी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. सांताक्लॉज , मदर मेरी , फादर जोसेफ , मेंढपाळ ...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात !

Image
“डान्स ऑफ द डिव्हाईन : रिदम्स ऑफ द वाइल्ड” संकल्पनेवर आधारित नृत्याविष्कारातून चिमुकल्यांचा जल्लोष ; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव , ता. २३ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात व रंगतदार वातावरणात पार पडले. यंदाचे स्नेहसंमेलन “डान्स ऑफ द डिव्हाईन : रिदम्स ऑफ द वाइल्ड” या प्रबोधनात्मक व कलात्मक संकल्पनेवर आधारित असल्याने संपूर्ण कार्यक्रमात दैवी ऊर्जा , निसर्गाची लय , वन्य सौंदर्य व सांस्कृतिक वारसा यांचे सुरेख दर्शन घडले. या कार्यक्रमासाठी श्री. अविनाशजी रायसोनी , श्री. प्रदीपजी रायसोनी , डॉ. शेखरजी रायसोनी , श्री. महेंद्रजी रायसोनी , जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तसेच जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलकजी रायसोनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांच्या स्वागतगीत व गणेश वंदनेने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. “डान्स ऑफ द डिव्हाईन : रिदम्स ऑफ द वाइल्ड” या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकारांतू...

“जी. एच. रायसोनी करंडक” एकांकिका स्पर्धेत मुजे महाविध्यालयाची “भोरपी” प्रथम

Image
१ ते ४ फेब्रुवारीला नागपूर येथे अंतिम फेरी ; अंतिम फेरीत एकूण ₹ २ लाख ७५ हजारांची पारितोषिके जळगाव , ता. २२  :  महाविद्यालयीन युवक-युवतींच्या उत्स्फूर्त सहभागाने जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित “जी. एच. रायसोनी करंडक” या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘भोरपी’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट , जळगाव येथे रविवार , ता. २१ रोजी झालेल्या या प्राथमिक फेरीत नूतन मराठा महाविद्यालय , जळगाव यांची ‘मारुतीची जत्रा’ या एकांकिकेने द्वितीय , तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट , जळगाव यांच्या ‘नो सिग्नल’ या एकांकिकेला तृतीय पारितोषिक मिळाले. परीक्षक प्रशंसनीय पुरस्काराने साने गुरुजी कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय , शहादा (जि. नंदुरबार) यांच्या ‘मादी’ या एकांकिकेला गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक व बालरंगभूम...

२१ डिसेंबरला रंगणार “जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी

Image
स्पर्धेत १० महाविद्यालयांचे नाट्यप्रयोग ; अंतिमला २ लाख ७५ हजारांची पारितोषिके जळगाव , ता. १८ : ‘जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय जी. एच. रायसोनी करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार , ता. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून शिरसोली रस्त्यावरील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट , जळगाव येथे संपन्न होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई , पुणे , नाशिक , अकोला , सोलापूर , अमरावती , अलिबाग , रत्नागिरी , कोल्हापूर व नागपूर येथील विविध महाविद्यालयांचे नाट्यसंघ सहभागी होत असून , प्रत्येक केंद्रातून निवडली जाणारी सर्वोत्कृष्ट एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. जळगाव विभागाच्या प्राथमिक फेरीत ता. २१ डिसेंबर रोजी एकूण १० महाविद्यालयांचे नाट्यसंघ सहभागी होणार असून सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सलग एकांकिका सादरीकरण होणार आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , धरणगाव यांचे ‘शेवटचं पत्र’ , तर ११ ते १२ दरम्यान खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी , कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमे...

माजी विद्यार्थ्यांमुळेच महाविद्यालयाची ओळख निर्माण होते : संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘ नॉस्टेलजिया – २०२५ ’ अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न ; मॅनेजमेंट व अभियांत्रिकी शाखेतील माजी विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग जळगाव , ता. १३ : विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून प्रत्येक पिढी पुढील पिढीसाठी आदर्श ठरत असते. रायसोनी इस्टीट्यूटच्या जळगाव शाखेच्या संस्थापक सदस्य म्हणून मी सन २००७ पासून आजपर्यंतच्या प्रवासाची साक्षीदार आहे. त्या वेळी अवघ्या २०० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही वाटचाल आज सुमारे ४५०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. या काळात संस्थेने सातत्याने उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करत विद्यार्थ्यांना घडविले आहे. रायसोनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समाज , उद्योगजगत तसेच विविध क्षेत्रांच्या अपेक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करत आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीतून मिळवलेले यश हेच खरे महत्त्वाचे असून त्यामुळे आई-वडील तसेच महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल होते , असे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्या जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे आयोजित ‘ नॉस्टेलजिया – २०२...