Posts

Showing posts from November, 2025

जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे दुहेरी क्रीडा यश ; रौप्य पदक आणि ४ खेळाडूंची निवड

Image
मल्लखांबमध्ये सागर चौधरीचे रौप्य यश ; तर ४ खेळाडूंची ‘अश्वमेध–२०२५ ’ या स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड जळगाव , ता. १  : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट , जळगाव येथील खेळाडू  सागर किशोर चौधरी याने अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पिरॅमिड प्रकारात रौप्य पदक पटकावले. ही स्पर्धा २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान विनायक मिशन रिसर्च फाउंडेशन , चेन्नई येथे झाली. सागर हा सलग तीन वर्षे विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करत असून त्याचे हे सततचे उत्कृष्ट योगदान गौरवण्यासारखे आहे. दरम्यान , जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील ४ खेळाडूंची ‘अश्वमेध क्रीडा स्पर्धा– 2025’ साठी क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. यात टेबल टेनिस : योगेश्वरी भोई , वेदांती पाटील बास्केटबॉल : धनश्री पाटील , खुशी सूर्यवंशी यांचा समावेश आहे.  ही स्पर्धा ४ ते ८ डिसेंबर दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड येथे होणार आहे. यावेळी खेळाडूंचा सत्कार करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी...

जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

Image
भावी करिअरची दिशा दाखवणारा उपक्रम ; विविध क्लासेस व शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग जळगाव : जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी , योग्य विषय निवडीचे महत्त्व आणि स्पर्धात्मक परीक्षांची दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. संदीप पाटील यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या जबाबदारी पार पाडली. तसेच प्रा. नैना चौधरी , प्रा. प्रियंका मल , प्रा. निकिता कौरानी , प्रा. शीतल किनगे , प्रा. गुंजन चौधरी , प्रा. अभिषेक सुरैया , प्रा. नेहा लुनिया, प्रा. राहुल यादव आणि प्रा. मीनाक्षी पाटील यांनी विविध विषयांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात जळगाव शहरातील विविध क्लासेस व स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.अनिल सोनार आणि श्री.संतोष मिसाळ यांनी मोलाचे सहक...

जी. एच. रायसोनी स्कूल व महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

Image
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन , निबंध–वक्तृत्व स्पर्धा आणि बहुभाषिक प्रस्ताविकेच्या वाचनातून विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल व्यक्त केला आदर जळगाव , ता. २७  :  येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट महाविध्यालय तसेच सावखेडा शिवार येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. दोन्ही संस्थांत विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव आणि अभिमान जागविण्यात आला. महाविध्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व एनएसएस समन्वयक प्रा. अमोल जोशी यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. प्रमुख मार्गदर्शिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी संविधान दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असल्याचे सांगितले. विविध धर्म–संस्कृतींच्या १४० कोटी लोकसंख्येला एकत्र बांधणारे सामर्थ्य भारतीय संविधानात असल्याचे त्यांनी नमूद केले. मूलभूत अधिका...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा “वार्षिक क्रीडा महोत्सव” जल्लोषात संपन्न

Image
स्कूलच्या क्रीडांगणावर भव्य स्वरूपात महोत्सव पार पडला ; विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे आकर्षक सादरीकरण जळगाव , ता. २४ : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही अत्यंत महत्त्वाचा असल्याची जाणीव ठेवत दरवर्षीप्रमाणे सावखेडा (शहरालगत) येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा “क्रीडा महोत्सव” उत्साहात आयोजित करण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रतीक असलेली क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमात मुख्याध्यापिका श्रीमती क्रिस्टाबेल परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून खेळाची प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्धरीत्या केलेल्या मार्चपास्टने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या , “ क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून उद्याचे उत्कृष्ट खेळाडू घडतात. प्रत्येक विद्यार्थ्याला आपली कला व खेळ कौशल्य सादर कर...

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात एसटीसार्कची मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह; ५ विद्यार्थ्यांची उच्च वेतन पॅकेजसह निवड

Image
१६ जणांना इंटर्नशिप व प्री-प्लेसमेंट ऑफर ; सलग होत असलेल्या निवडींमुळे आनंदाचे वातावरण - ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचा उपक्रम जळगाव , ता. २२   : स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निवड होत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे विद्यार्थी तांत्रिक , सॉफ्ट स्किल्स व इंडस्ट्री-ओरिएंटेड ट्रेनिंगच्या जोरावर रोजगारक्षम होत असल्याचे स्पष्ट दिसून येते. याच अनुषंगाने एसटीसार्क (सहजानंद टेक्निकल सर्व्हिसेस अँड रिसर्च सेंटर प्रा. लि. , पुणे/नाशिक) या कंपनीतर्फे आयोजित कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये बी.टेक (सीएसई , डीएस , एआय , एआयएमएल , आयटी) शाखांच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी एकूण ११२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली , तर ५२ विद्यार्थी टेक्निकल व एचआर मुलाखतींना उपस्थित राहिले. यापैकी १६ विद्यार्थ्यांची इंटर्...

वाढत्या थंडीत रायसोनी महाविद्यालयाचा उबदार हात ; निराधार बालक व महिलांना उबदार वस्त्रांचे वाटप

Image
शिवाजी नगर व एमआयडीसी परिसरातील गरजू कुटुंबीयांना दिलासा ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन जळगाव , ता. २० : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट आणि एमबीए विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर , एमआयडीसी परिसर तसेच रेल्वे व बसस्थानक परिसरातील गरजू कुटुंबीयांना वाढत्या थंडीनिमित्त उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. थंडीमुळे सर्वाधिक त्रास होणाऱ्या निराधार बालक व महिलांना या उपक्रमातून मोठा दिलासा मिळाला. विद्यार्थ्यांनी संवेदनशीलता दाखवत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक आणली. हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. उपक्रमाच्या सुरुवातीला संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की , जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देतो. सामाजिक जाण , जबाबदारीची भावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी महाविद्यालयात अशा उपक्रमांच...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “उर्जयती-२०२५” : दिग्गज उद्योजकांचा संवाद व नवउद्योजकतेला नवी उर्जा

Image
एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत ५ दिवसांचे वर्कशॉप अ‍ॅन्ड बूट कॅम्प : फॅमिली बिझनेस , स्टार्टअप्स आणि उद्योजकतेतील आव्हानांवर उपाय व संधींचा व्यापक आढावा जळगाव , ता. १८ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट आणि करिअर कौन्सिल सेलतर्फे “ऊर्जयती-२०२५” या शीर्षकाखाली इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ता. १३ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला. या पाच दिवसीय कार्यशाळेत विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात कोगटा ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रेम कोगटा , विनले पॉलिमर्सचे संचालक पोरस संचेती, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील , कार्यक्रम समन्वयक प्रा. तन्मय भाले व प्रा. डॉ. विशाल राणा हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी “उर्जयती-२०२५” या कार्यशाळेचे उद्देश ,...