जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा “वार्षिक क्रीडा महोत्सव” जल्लोषात संपन्न
स्कूलच्या क्रीडांगणावर भव्य स्वरूपात महोत्सव पार पडला; विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे आकर्षक सादरीकरण
जळगाव, ता. २४ : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक
विकासाबरोबरच शारीरिक विकासही अत्यंत महत्त्वाचा असल्याची जाणीव ठेवत
दरवर्षीप्रमाणे सावखेडा (शहरालगत) येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे २०२५-२६
या शैक्षणिक वर्षाचा “क्रीडा महोत्सव” उत्साहात आयोजित करण्यात आला.
महोत्सवाचे
उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रतीक असलेली
क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात
मुख्याध्यापिका श्रीमती क्रिस्टाबेल परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यार्थ्यांकडून खेळाची प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अतिशय
शिस्तबद्धरीत्या केलेल्या मार्चपास्टने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या, “क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून उद्याचे
उत्कृष्ट खेळाडू घडतात. प्रत्येक विद्यार्थ्याला आपली कला व खेळ कौशल्य सादर
करण्याची संधी देणे हाच या आयोजनामागील हेतू आहे.” त्यांनी आपल्या शालेय जीवनातील
आठवणी सांगत विद्यार्थ्यांना निरोगी राहण्यासाठी नियमित खेळत राहण्याचा सल्ला
दिला.
महोत्सवाच्या
दुसऱ्या दिवसाचे प्रमुख पाहुणे आणि ‘आयरन मॅन’ म्हणून प्रसिध्द श्री. प्रतीक
मणियार यांनी विद्यार्थ्यांना जीवनात क्रीडेचे महत्त्व अधोरेखित करत प्रोत्साहनपर
मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी पालकांना आपल्या
मुलांसोबत खेळांमध्ये सहभाग घ्यावा, त्यांना
प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. महोत्सवाच्या पुढील टप्प्यात स्कूलच्या चारही
हाऊसच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साही सहभाग नोंदवला. क्रिकेट, लेग क्रिकेट, रस्सीखेच, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, पोहणे, तसेच विविध अंतरांच्या धावण्याच्या शर्यती
अशा स्पर्धांनी मैदान रंगून गेले. माँटेसरीच्या लहानग्यांनीही उत्साहात सहभाग
घेतला.
या
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी स्कूलचे व्यवस्थापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक तसेच
स्कूल कमिटीने मोलाचे सहकार्य केले. यशस्वी आयोजनाबद्दल जी. एच. रायसोनी पब्लिक
स्कूलच्या संचालिका सौ. पलकजी रायसोनी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.



.jpeg)

Comments
Post a Comment