जी. एच. रायसोनी महाविद्यालयात अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे संशोधनात्मक सादरीकरण
एआय , सायबर सुरक्षा , स्मार्ट ऊर्जा , ईव्ही , रोबोटिक्ससह विविध तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांचे प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले कौतुक जळगाव , ता. २९ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट , जळगाव येथे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ‘प्रोजेक्ट प्रेझेंटेशन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध अभियांत्रिकी विभागांतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान , संशोधन व नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांमधून प्रत्यक्ष जीवनातील विविध समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना मांडल्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार , मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील , इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. बिपासा पात्रा , संगणक अभियांत्रिकी वि...