“एनपीटीईएल कोर्स”मध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाची दमदार कामगिरी; १९ ऑल इंडिया टॉपरसह १६ एलिट-गोल्ड

उत्तर महाराष्ट्रात प्रथम कामगिरीचा मान; दोन सत्रांत ९७७ विद्यार्थ्यांचा परीक्षा सहभाग, १६० एलिट-सिल्व्हर व ७ एनपीटीईएल सुपरस्टार

जळगाव, ता. २२ : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमासोबतच त्यांच्या आवडीनुसार नवनवीन कौशल्ये आणि उद्योगाभिमुख ज्ञान आत्मसात करता यावे, यासाठी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात एनपीटीईएलच्या माध्यमातून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाविद्यालयाने एनपीटीईएलच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली असून, दोन सत्रांमध्ये तब्बल ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यामध्ये १६ विद्यार्थ्यांनी एलिट-गोल्ड, १६० विद्यार्थ्यांनी एलिट-सिल्व्हर, १९ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया टॉपर, तर ७ जणांनी एनपीटीईएल सुपरस्टार अशी कामगिरी केली आहे. या उपक्रमासाठी २४ फॅकल्टी मेंटर्स कार्यरत होते. एनपीटीईएलच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारची प्रथम उल्लेखनीय कामगिरी करणारे महाविद्यालय म्हणून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाची नोंद झाली आहे.  

या उल्लेखनीय यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच सर्व विभागप्रमुखांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

१९ ऑल इंडिया टॉपरची उल्लेखनीय नोंद

एनपीटीईएलच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया टॉपर म्हणून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. यामध्ये कौस्तुभ तात्पुजे व वैभव संदीप दैवद्न्य यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमात, तर आदित्य भोजराज चावले, प्रेम गोरखनाथ भोई, एकता अनिल काळे आणि ताडे नयना प्रभाकर यांनी ‘अॅडव्हर्टायझिंग अँड प्रमोशन्स मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमात ऑल इंडिया टॉपर म्हणून यश मिळविले आहे.

याशिवाय प्रणव चंद्रशेखर पाटील, तबिश हाशिम शेख शहनोड्दीन आणि रेहमत खलिल पिंजारी यांनी ‘मार्केटिंग मॅनेजमेंट–२’ या अभ्यासक्रमात, तर निखिल अमृत म्हस्कर आणि मोहित प्रमोद महाजन यांनी ‘कन्झ्युमर बिहेविअर’ या अभ्यासक्रमात ऑल इंडिया टॉपर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

प्राध्यापकांचाही कौशल्यविकासात सक्रिय सहभाग

विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही एनपीटीईएलच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये सहभाग नोंदवून ऑल इंडिया टॉपर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रा. डॉ. बिपासा बिमलेंदू पात्रा यांनी ‘इंग्लिश लँग्वेज फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झॅम्स’, ‘एन्हान्सिंग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी’, ‘लर्निंग इंग्लिश इन हिंदी’, ‘सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट’ आणि ‘डेव्हलपिंग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी’ या विविध अभ्यासक्रमांमध्ये टॉपर म्हणून यश मिळविले आहे.

तसेच प्रा. योगेश प्रकाश वंजारी यांनी ‘मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस टेक्नॉलॉजी–१ अँड २’, प्रा. प्रियांशी जगदीप बोरसे यांनी ‘इंट्रोडक्शन टू ऑपरेटिंग सिस्टिम्स’, प्रा. शीतल शिवनारायण जाधव यांनी ‘सायबर सिक्युरिटी अँड प्रायव्हसी’, तर डॉ. स्वाती अरुण पाटील यांनी ‘मार्केटिंग मॅनेजमेंट–२’ आणि ‘डेटा मायनिंग फॉर डिसिजन मेकिंग’ या अभ्यासक्रमांमध्ये टॉपर म्हणून कामगिरी केली आहे. तसेच या संपूर्ण एनपीटीईएल उपक्रमाचे समन्वयन एनपीटीईएल एसपीओसी (SPOC) डॉ. सौरभ सुनील नाईक यांनी केले.

‘प्राध्यापकांनी अपडेटेड राहणे गरजेचे’ – संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

आजच्या काळात स्किल-बेस्ड शिक्षण हा पर्याय नसून काळाची गरज आहे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमाला काही निश्चित मर्यादा असतात आणि बदलत्या काळानुसार त्यामध्ये वारंवार बदल करणे शक्य होत नाही. मात्र, इंडस्ट्रीच्या गरजा, अपेक्षा आणि तंत्रज्ञानातील बदल सातत्याने होत आहेत. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चे वाढते महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना आधुनिक व कौशल्याधारित शिक्षण देणे आवश्यक आहे. एनपीटीईएलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विविध इंडस्ट्री-रिलेव्हंट कोर्सेस शिकण्याची संधी मिळत असून, त्यातून विषयज्ञानासोबत कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांसारखी कौशल्ये विकसित करण्यास मदत होत आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी एनपीटीईएलचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरत आहेत. महाविद्यालयाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांमधून दोन क्रेडिट्सचा लाभही मिळतो.

इंडस्ट्रीच्या बदलत्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांनीही स्वतःला सातत्याने अपडेटेड व अपग्रेड करणे अत्यंत गरजेचे आहे. प्राध्यापक स्वतः नवीन ज्ञान, तंत्रज्ञान आणि बदलत्या कार्यपद्धती आत्मसात करतील, तेव्हाच विद्यार्थ्यांना आवश्यक आणि सर्वोत्तम ज्ञान देता येईल. प्राध्यापकांचा सातत्यपूर्ण विकास ही शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीची महत्त्वाची गरज असून, एनपीटीईएल हे त्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांना या संधींचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील स्वतंत्र विभाग सातत्याने कार्यरत आहे, असे प्रा. डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

विद्यार्थी-प्राध्यापकांच्या सहभागातून शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा

एनपीटीईएलच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी ही संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाची नोंद आहे. उपलब्ध साधनसामग्री, वाचन साहित्य आणि अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात केली, तर प्राध्यापकांनीही बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी एनपीटीईएलच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेतला. विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा हा सातत्यपूर्ण सहभाग शिक्षणाची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यास हातभार लावत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे वर्षभर विविध शैक्षणिक, कौशल्यविकासात्मक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबविले जातात. बदलत्या शैक्षणिक व औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी नवे ज्ञान व कौशल्ये आत्मसात केल्याने संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळत आहे. शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता आणि व्यापक विकास साधण्यासाठी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचा सातत्यपूर्ण सहभाग महत्त्वाचा असल्याचेही प्रा. डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले.

एनपीटीईएल म्हणजे काय?

एनपीटीईएल अर्थात ‘नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग’ हा ऑनलाइन अभ्यासक्रमांचा उपक्रम असून, विविध विषयांतील ज्ञान व कौशल्यविकासासाठी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना ऑनलाइन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांचा या उपक्रमातील सक्रिय सहभाग कौशल्याधारित आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला मिळणारी चालना अधोरेखित करणारा ठरत आहे. 

Comments

Popular posts from this blog

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव