Posts

Showing posts from March, 2026

जी. एच. रायसोनीत “टेक्नोरीओन - २०२६” नवकल्पनांचा जल्लोष; तरुण अभियंत्यांना राष्ट्रीय व्यासपीठ

Image
तांत्रिक कौशल्यांचा प्रभावी आविष्कार ; विविध महाविद्यालयांतील ४९६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग , ३० हजारांची पारितोषिके व उत्कृष्ट नियोजनाची दाद जळगाव , ता. २७ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात “टेक्नोरीओन – २०२६” हा राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेने यंदाही विद्यार्थ्यांच्या कल्पकता , नवोपक्रमशीलता आणि तांत्रिक कौशल्यांचा प्रभावी आविष्कार घडवून आणला. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तथा अॅकोचे प्रिन्सिपल प्रॉडक्ट मॅनेजर नितीन ब्रम्हणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल होत्या. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार , मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील , ...

एमबीए-एमसीए सीईटी तयारीसाठी रायसोनीत मोफत ‘क्रॅश कोर्स’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
सीईटी स्कोर वाढविण्यावर विशेष भर ; अनुभवी प्राध्यापकांकडून आठवडाभर सखोल मार्गदर्शन जळगाव , ता. २३ : एमबीए व एमसीए सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रॅश कोर्स’ला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. एमबीए व एमसीए विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला शहरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (स्टेट सीईटी सेल) मार्फत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हा आठवडाभराचा मोफत क्रॅश कोर्स राबविण्यात येत आहे. २३ ते २८ मार्च या कालावधीत दररोज दुपारी २ ते ४.३० या वेळेत सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या कोर्समध्ये लॉजिकल रिझनिंग , क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड , व्हर्बल अ‍ॅबिलिटी व रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तसेच अ‍ॅब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या विषयांवर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय परीक्षेतील प्रश्नांची सोडवणूक तंत्र , वेळेचे नियोजन , शॉर्टकट पद्धती आणि गुण वाढविण्यासा...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “वार्षिक विद्यार्थी गुणगौरव समारंभ” उत्साहात

Image
वर्षभरातील शैक्षणिक , क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यशाची दखल ; मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्रांचे वितरण करून गौरव जळगाव, ता. २०  : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात “वार्षिक विद्यार्थी गुणगौरव समारंभ” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या समारंभात वर्षभरात शैक्षणिक , सांस्कृतिक , क्रीडा तसेच विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल उपस्थित होत्या. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील , सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार , मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील , संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. चेतन चौधरी , आयटी/डेटा सायन्स विभागप्रमुख डॉ. निलेश इंगळे , इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील , डेटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा....