जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “वार्षिक विद्यार्थी गुणगौरव समारंभ” उत्साहात
वर्षभरातील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यशाची दखल ; मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्रांचे वितरण करून गौरव
जळगाव, ता. २० : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात “वार्षिक विद्यार्थी गुणगौरव समारंभ” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या समारंभात वर्षभरात शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल उपस्थित होत्या.
यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता
पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.
डॉ. शंतनू पवार,
मॅकेनिकल
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. चेतन चौधरी, आयटी/डेटा सायन्स विभागप्रमुख डॉ. निलेश
इंगळे, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख
प्रा. डॉ. तुषार पाटील,
डेटा
सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील, एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे
तसेच ॲडमिशन डीन प्रा. रफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना अकॅडमिक डीन प्रा.
डॉ. संजय शेखावत यांनी विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील
उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला. त्यांनी या समारंभाच्या माध्यमातून गुणवंत
विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा
देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये
स्पर्धात्मकता, आत्मविश्वास व उत्कृष्टतेकडे वाटचाल
करण्याची स्फूर्ती निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात जी.
एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “को-करिक्युलर” व “एक्स्ट्रा-करिक्युलर”
उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, केवळ पाठ्यपुस्तकांवर आधारित शिक्षण
विद्यार्थ्यांना पूर्णत्व देऊ शकत नाही; तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व
बाजूंना स्पर्श करणारे शिक्षण आवश्यक आहे. महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या
विविध कला, क्रीडा, तांत्रिक
स्पर्धा, प्रकल्प, सामाजिक
उपक्रम आणि नेतृत्व विकास कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव
मिळतो आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आजच्या
स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी बहुआयामी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.
संवादकौशल्य, टीमवर्क, वेळेचे
व्यवस्थापन, समस्या
सोडवण्याची क्षमता आणि नवोपक्रमशीलता या गुणांमुळेच विद्यार्थी जागतिक स्तरावर
यशस्वी होऊ शकतात. महाविद्यालय हे केवळ शिक्षण देणारे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या
स्वप्नांना दिशा देणारे आणि त्यांना सक्षम नागरिक बनविणारे व्यासपीठ आहे, तसेच डिजिटल
युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञानसंपादन वाढविण्याचे आवाहन करत शेवटी
त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यातही अशाच प्रकारे विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवून
महाविद्यालयाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये
अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेतील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांसह
क्रीडा, सांस्कृतिक, कला, वक्तृत्व, पोस्टर
प्रेझेंटेशन, युथ
फेस्टिवल तसेच राष्ट्रीय सेवा योजना आदी विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी
करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया भंगाळे व गोविंद मंधान
या विध्यार्थ्यानी केले. कार्यक्रमाच्या शेवटी वार्षिक पारितोषिक वितरण
समारंभप्रमुख तसेच सांस्कृतिक समन्वयक प्रा. वसीम पटेल व क्रीडा समन्वयक सागर
पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व
समिती प्रमुख, सदस्य, प्राध्यापक
व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर समारंभाचे यशस्वी आयोजन
केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी विजेत्यांचे अभिनंदन
केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
क्रीडा स्पर्धांतील प्रमुख विजेते
कॅरम
:
प्रथम
– कृष्णा पाटील,
द्वितीय
– लोकेश पाटील,
तृतीय
– हर्षल पाटील
(मुली)
प्रथम – अभिश्री चव्हाण,
द्वितीय
– पूजा इबितदार,
तृतीय
– मयुरी पाटील
बॅडमिंटन
:
प्रथम
– लक्ष शर्मा,
द्वितीय
– राज बगवानी,
तृतीय
– चिन्मय पाठडे
(मुली)
प्रथम – रुतुजा पाटील,
द्वितीय
– अभिश्री चव्हाण,
तृतीय
– तेजश्री पाटील
बुद्धिबळ
:
प्रथम
– जुनैदआलम शहबोद्दिन,
द्वितीय
– जय पाटील,
तृतीय
– तेजस बाविस्कर
(मुली)
प्रथम – अलिशा तेली,
द्वितीय
– सादिया पटेल,
तृतीय
– वैश्णवी भावसार
टेबल
टेनिस :
प्रथम
– तेजस बाविस्कर,
द्वितीय
– सुजल सोनवणे,
तृतीय
– सिद्धेश बगे
(मुली)
प्रथम – पूनम राजहंस,
द्वितीय
– स्वार्धा वानरे,
तृतीय
– प्रिया भदाणे
टग ऑफ वॉर :
भावेश
शेलकर, यश
बोरसे, मुहीब
शेख, शहजेब
सय्यद, अरसलान
इफ्तेखार, शंतनू
पाटील, आकाश
पाटील, फैज
शेख या विध्यार्थ्यांच्या संघांनी उत्कृष्ट समन्वय व ताकद दाखवत विजेतेपद पटकावले.
टग ऑफ वॉर :
(मुली) दिशा पाटील, कुमुद भोळे, नेहा बडगुजर, स्नेहा पाटील, स्नेहा सरोदे, कोमल महाजन, रोशनी सोलंके, राधिका पाटील या
विध्यार्थीनीच्या संघांनी उत्कृष्ट समन्वय व ताकद दाखवत विजेतेपद पटकावले.
व्हॉलीबॉल
:
अनिकेत पाटील, सुरेंद्र पाटील, गौरव पाटील, प्रवीण महाजन, मयूर अजित पाटील, दानिश आरिफ
हा बीसीए
तृतीय वर्षाचा संघ विजेता ठरला तर बी.टेक प्रथम वर्ष संघ उपविजेता
बास्केटबॉल
:
तनमय नितीन पाटील, आदित्य हरिश्चंद्र राजपूत, रुद्र अजय पटेल, घनश्याम गुरुदास वाघ, श्रेया प्रवीण चौधरी, तेजश्री अशोक पाटील
हा बीबीए
तृतीय वर्षाचा संघ विजेता ठरला तर बी.टेक तृतीय वर्ष संघ उपविजेता
क्रिकेट
:
चेतन संजय पाटील, हर्षल गुलाबराव पाटील, मोहन नंदकिशोर राणे, साहिल समाधान पाटील, वैश्णवी प्रकाश मुळीक, सेजल सुधीर सोनवणे
हा बीसीए
तृतीय वर्षाचा संघ विजेता ठरला तर बी.टेक तृतीय वर्ष संघ उपविजेता
-------------------
सांस्कृतिक स्पर्धांतील प्रमुख विजेते
नॅशनल यूथ डे : साक्षी सुनील कासार, सुमित खैरे, मोहित अशोक बडगुजर
बॉलिवूड डे : खुशबू धाके, भाग्येश चौधरी. रिया भंगाळे
किड्स डे : साक्षी पाटील
साडी डे : भूमिका जाधवानी वैश्णवी पाटील, निकिता मुंदोकर, हर्षिता कुकरजा.
ग्रुप डे : एमबीए ग्रुप, पल्लवी पाटील व ग्रुप, तेजस व ग्रुप.
हॉरर डे : रिया व रुची चौधरी, रोशनी पाटील, नेहा बडगुजर.
कलर ब्लॉक डे : नेहा चौधरी व ग्रुप, गौरव महाजन व ग्रुप, निखिल व स्नेहा.
कल्चरल डे : संदीश चौधरी, नेहा बडगुजर, यशवंत चव्हाण,
मिसमॅच डे : नेहा चौधरी,प्रथ्मेश मिसार, सुमन मीणा, अनुश्का आसनसे.
रेट्रो रिमिक्स डे : भूमिका जाधवानी, खुशबू धाके.
अंताक्षरी : निखिल मंधान व टीम, प्रथमेश मिसार व टीम, रोहित वंजारी व टीम.
डिपार्टमेंटल वॉर : बीसीए विभाग, बीबीए विभाग, अदिती चव्हाण
फॅशन शो विशेष पुरस्कार :
बेस्ट स्माईल – अस्मिता हडप
बेस्ट अटायर – मोक्षदा पाटील
बेस्ट पर्सनॅलिटी – रिचर्ड पिंटो
बेस्ट वॉक – मोहम्मद माज
अंतराग्नी (व्यक्तिमत्त्व स्पर्धा) :
मिस्टर अंतराग्नी (अभियांत्रिकी) – पवन महाजन
मिस अंतराग्नी (अभियांत्रिकी) – निधी बाजपेयी
मिस्टर अंतराग्नी (व्यवस्थापन) – गोविंद मंधान
मिस अंतराग्नी (व्यवस्थापन) – नेहा चौधरी,
गीत गायन : जान्हवी चितळे,प्रणव इखे, स्नेहा जगदाळे, सूरज खंडागळे.
नृत्य (सोलो) : राहुल यादव, युक्ता काळे, भावेश कनहैय्या.
नृत्य (ड्युएट) : रिया भंगाळे व रुची चौधरी, साहिल शेख व श्रुती पाटील.
नृत्य (ग्रुप) : भूमिका जाधवानी – डान्सिंग दिवाज, श्वेता भंगाळे, साक्षी पाटील (बीबीए व बीसीए).

.jpeg)
.jpeg)
.jpeg)


Comments
Post a Comment