Posts

Showing posts from February, 2026

‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.०’ला दिमाखात प्रारंभ ; जी. एच. रायसोनीत नवसंशोधनाचा महोत्सव

Image
१८ राज्यांतील ७० शहरांमधून २८४ संघांचा उत्स्फूर्त सहभाग ; सलग ३० तासांच्या राष्ट्रीय हॅकाथॉनला भव्य उद्घाटनाने सुरुवात जळगाव , ता. २८ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.०’ या बहुप्रतिक्षित तांत्रिक स्पर्धेचा आज उत्साहात शुभारंभ झाला. देशभरातील १८ राज्यांतील ७० शहरांमधून तब्बल २८४ संघांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी कठोर परीक्षण प्रक्रियेनंतर निवडलेल्या अव्वल ४० संघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. ही स्पर्धा सलग ३० तासांची ऑफलाईन कोडिंग मॅरेथॉन स्वरूपात पार पडत आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला विनले पॉलिमर्स प्रा. लि. चे संचालक श्री. प्रमोद संचेती तसेच गूगलमध्ये डेवऑप्स आणि क्लाऊड इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या सलोनी सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपस्थितां...

१८ राज्यांतील ७० शहरांमधून २८४ संघ जळगावात; रायसोनीत उद्या ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.०’चा प्रारंभ

Image
२८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा ; सलग ३० तासांच्या हॅकाथॉनमध्ये इनोव्हेशनची शर्यत जळगाव , ता. २७ :   जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.०’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेची अंतिम फेरी उद्या , २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील विविध अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांमधील निवडक विद्यार्थी संघ सहभागी होणार असून जळगाव शहर पुन्हा एकदा नवकल्पनांच्या उत्सवाचे साक्षीदार ठरणार आहे. महाविद्यालयाच्या मुख्य प्रांगणात नुकतेच स्पर्धेच्या पोर्टलचे उद्घाटन संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जानेवारी महिन्यात आयडिया स्क्रीनिंग प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर तज्ज्ञ समितीमार्फत गुणवत्ताधारक संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती देताना सांगितले की , राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथ...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या भव्य टर्फवर रंगली ‘रायसोनी प्रीमियर लीग’

Image
क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांचा जल्लोष ; “ रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी जळगाव”तर्फे आयोजन जळगाव , ता. २४ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या “रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी जळगाव”तर्फे महाविद्यालयाच्या परिसरात नव्याने उभारलेल्या अत्याधुनिक व भव्य टर्फ मैदानावर ‘रायसोनी प्रीमियर लीग’ (आरपीएल) क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कार , संघभावना आणि नेतृत्वगुणांना प्रभावी चालना मिळाली. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की , रायसोनी प्रीमियर लीग ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून विद्यार्थ्यांमध्ये टीम बॉन्डिंग , स्पोर्ट्समॅनशिप आणि रोटरॅक्ट स्पिरिट रुजविणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. खेळातून मैत्री , नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित होते. अभ्यासासोबत क्रीडांगणावरील सहभाग विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवतो. अशा उपक्रमांमधून फन , एनर्जी आणि अविस्मरणीय क्षणांचा संगम घडतो ...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे प्रा. रफिक जमील शेख यांचा राष्ट्रीय गौरव

Image
“कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स व शैक्षणिक प्रशासन” क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल ; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते तुषार कपूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान जळगाव, ता : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रा. रफिक जमील शेख यांना ‘एमिनेंट फिगर इन कॉम्प्युटर  अ‍ॅ प्लिकेशन्स अँड एज्युकेशनल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन २०२६’ या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. “इन्साईट्स सक्सेस आयोजित नॅशनल प्रेस्टिज अवॉर्ड्स २०२६” सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा भव्य पुरस्कार सोहळा रॅडिसन ब्लू , नवी दिल्ली येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते तुषार कपूर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रा. शेख यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कॉम्प्युटर  अ‍ॅ प्लिकेशन्स क्षेत्रातील संशोधन , शैक्षणिक प्रशासनातील प्रभावी नेतृत्व , तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. प्रा. शेख यांनी महाविद्यालयीन व्यवस्थापन , विद्यार्थी विकास , नवोपक्रम आणि श...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “शिवमहोत्सव” उत्साहात साजरा

Image
शिवजयंती पूर्वसंध्येला शिवभक्तीचा जल्लोष ; मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन , ‘ छत्रपती शिवाजी’ सजीव देखाव्याने विद्यार्थी भारावले जळगाव , ता. १८ : पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी , महाराष्ट्र धर्माचे प्रतीक असलेले भगवे झेंडे , शिवरायांच्या पराक्रमाची गीते , ‘ जय शिवराय’च्या गगनभेदी घोषणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी अशा आगळ्यावेगळ्या पारंपरिक वातावरणात जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात बुधवार (ता. १८) रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‘शिवमहोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. महाराजांच्या भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्यासह प्राध्यापक , प्राध्यापकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले क...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रेन्युअरशिप’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे भव्य आयोजन

Image
इंडस्ट्री 5.0 ते एआयपर्यंत संशोधनाचा नवा अध्याय ; देश-विदेशातील तज्ज्ञ , उद्योग नेते व संशोधकांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव , ता. १६ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात “ड्रायव्हिंग स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिटिव्हनेस थ्रू डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड सस्टेनेबल इनोव्हेशन” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ५ वी आंतरराष्ट्रीय परिषद इनोव्हेशन , टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रेन्युअरशिप ‘आयटीई २०२६’ उत्साहात संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाले. प्रारंभी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका व परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सविस्तर प्रास्ताविक करताना संस्थेची संशोधन , इनोव्हेशन व उद्योजकता क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाटचाल अधोरेखित केली. “इनोव्हेशन आणि तंत्रज्ञान या एका नाण्याच्या दोन बाजू असून इंडस्ट्री 5.0 च्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता , मशीन लर्निंग , ब्लॉकचेन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड सर्जनशील विचारसरणीशी घालणे अत्यावश्यक आहे ,   मागील चार वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी ही परिषद संशोधक , नवउद्योजक , ...