जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “शिवमहोत्सव” उत्साहात साजरा
शिवजयंती पूर्वसंध्येला शिवभक्तीचा जल्लोष; मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन, ‘छत्रपती शिवाजी’ सजीव देखाव्याने विद्यार्थी भारावले
जळगाव,
ता. १८ : पारंपरिक
वेशभूषेतील विद्यार्थी, महाराष्ट्र धर्माचे प्रतीक असलेले भगवे
झेंडे, शिवरायांच्या पराक्रमाची गीते, ‘जय शिवराय’च्या गगनभेदी घोषणा आणि
छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी अशा आगळ्यावेगळ्या पारंपरिक वातावरणात जी. एच.
रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात बुधवार (ता. १८) रोजी
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‘शिवमहोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराजांच्या भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण
सुरुवात झाली. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी.
एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्यासह
प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि मोठ्या
संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होतेच; परंतु त्याचबरोबर ते उत्कृष्ट व्यवस्थापक, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि प्रभावी प्रशासक होते. त्यांच्या कार्यपद्धतीत नियोजन कौशल्य, प्रशासन क्षमता आणि राष्ट्रहिताची जाणीव स्पष्ट दिसून येते. उद्योग, जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच शिवकालीन तलावांची निर्मिती यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी काळाच्या पुढे जाऊन कार्य केले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना त्यांनी आपल्या काळात प्रभावीपणे राबविली. दुष्काळ निवारणाची यंत्रणाही त्यांच्या कार्यकाळात उभी राहिली. राष्ट्रप्रेम, स्त्रियांबद्दल आदरभाव आणि पराक्रम ही त्रिसूत्री त्यांनी स्वराज्याच्या रयतेला दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनीही
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा
घेऊन नेतृत्वगुण, शिस्त, नियोजन
आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी
‘छत्रपती शिवाजी’ या विषयावर आधारित सांस्कृतिक प्रात्यक्षिके सादर केली. सजीव
देखाव्याने उपस्थित विद्यार्थी भारावून गेले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वसीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली
तेजस प्रभाकर पाटील, प्रथमेश अंबादास गोसावी, उदय महेश व्हिरोडकर, तेजस प्रविण पाटील, गौतम पांडे, मोहित मोहन कोल्हे, गौरव राजपूत, विक्रांत पवार, हार्दिक चौधरी व गोपाल मंगा महाजन या
स्टुडंट कौन्सिलच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन सुमित खैरे यांनी केले.
शिवमहोत्सवाचे यशस्वी आयोजन
केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी
सर्वांचे कौतुक केले.







Comments
Post a Comment