Posts

जी.एच. रायसोनी महाविद्यालयात शिक्षक दिन सोहळा

Image
*ज्ञान, नवोपक्रम आणि संस्कारांच्या शिल्पकारांना सलाम!,२३ प्राध्यापकांच्या योगदानाचा गौरव* जळगाव,ता.०६ : ज्ञानदानातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करून सक्षम पिढी घडविणाऱ्या प्राध्यापकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, स्टुडंट काउन्सेलिंग, प्रवेश प्रक्रिया, एनपीटीईएल, स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, एंटरप्रेन्युअरशिप, सीएसआर, परीक्षा प्रशासन, ईआरपी इम्प्लिमेंटेशन, क्रीडा तसेच विद्यार्थी विकासाच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २३ प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे आणि अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरपर्सन श्रीमती निशा जैन उपस्थित होत्या. तसेच अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत आणि डीन (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) प्रा...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात‘माइंडफुलनेस, स्पिरिचुअलिटी अँड टेक्नॉलॉजी’वर तिसरी राष्ट्रीय परिषद संपन्न

Image
तंत्रज्ञानाला अध्यात्माची दिशा आणि माइंडफुलनेसची जोड काळाची गरज : मार्गदर्शकांचा सूर ; ९० हून अधिक संशोधन पेपर , ३०० हून अधिक संशोधकांचा सहभाग ; चार विषयाधारित ट्रॅकमध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन जळगाव , ता. 3 : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स विभागातर्फे ‘ माइंडफुलनेस , स्पिरिच्युअॅलिटी अँड टेक्नॉलॉजी (एनसीएमएसटी)’ या विषयावर तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनातील सजगता , आध्यात्मिक मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने अत्यंत समकालीन आणि चिंतनशील विषयावर आयोजित या परिषदेला देशभरातील संशोधक , प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिषदेत ९० हून अधिक संशोधन पेपर प्राप्त झाले असून ३०० हून अधिक संशोधकांनी सहभाग नोंदविला. विविध संशोधन विषयांची मांडणी चार विषयाधारित ट्रॅकमध्ये करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्ष तथा जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात आजच्या तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीत माइंडफुलने...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “स्टोरीज दॅट शेप अस” स्कीट स्पर्धा उत्साहात

Image
विद्यार्थ्यांनी विविध कथांचे प्रभावी नाट्यरूपांतर करत सादर केले वैविध्यपूर्ण स्कीट ; इयत्ता ५वी व ६वीच्या संघाने पटकावला प्रथम क्रमांक जळगाव , ता. ३१ : विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला , अभिनयकौशल्याला आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळावे , तसेच कथा आणि प्रसंगांच्या माध्यमातून जीवनातील विविध मूल्ये विद्यार्थ्यांना समजावीत , या उद्देशाने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “स्टोरीज दॅट शेप अस” या संकल्पनेवर आधारित स्कीट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध कथांचे प्रभावी नाट्यरूपांतर सादर करत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आशयाच्या कथा निवडून त्यांचे स्कीटच्या माध्यमातून सादरीकरण केले. प्रत्येक संघाने कथानकाला साजेसा अभिनय , प्रभावी संवादफेक , हावभाव आणि प्रसंगानुरूप सादरीकरण यांचा सुंदर मेळ साधला. काही कथांमधून मनोरंजनासोबतच मैत्री , सहकार्य , धैर्य , प्रामाणिकपणा , सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेण्यासारखी विविध जीवनमूल्ये अधोरेखित करण्यात आली. “स्टोरीज दॅट शेप अस” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी कथा या केवळ मनोरंजनाचे ...

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात गुणवंत खेळाडूंचा सन्मान

Image
‘अकॅडमिकसोबत स्पोर्ट्सही तितकेच महत्त्वाचे’ ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन — मेजर ध्यानचंद यांना अभिवादन जळगाव , ता. २९ : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अकॅडमिक शिक्षणासोबत क्रीडेलाही तितकेच महत्त्व आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या क्षमतेचा विकास करावा , स्पर्धेत जिंकण्याची जिद्द ठेवावी आणि सातत्यपूर्ण सराव , शिस्त व संघभावनेतून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे , असे प्रतिपादन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होत्या. रायसोनी महाविद्यालयात क्रीडा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात असून , नुकत्याच झालेल्या खेलोत्सवामध्येही विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त स...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

Image
तंत्रज्ञानाधारित उपायांना मिळाली दाद ; गोदावरीच्या ‘अल्गोनेक्स’ संघाने पटकावला प्रथम क्रमांक , तर अन्य विजेत्या संघांचीही चमकदार कामगिरी जळगाव , दि. २२ : विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप प्रक्रियेला अधिक पारदर्शक , शिस्तबद्ध , तंत्रज्ञानाधारित आणि उद्योगाभिमुख करण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘जीएचआर इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’ मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेची आणि तांत्रिक कौशल्याची प्रभावी झलक दाखविली. ‘ बिल्डिंग स्मार्टर इंटर्नशिप इकोसिस्टिम्स – इनोव्हेट • व्हॅलिडेट • एलेव्हेट’ या संकल्पनेवर आधारित या हॅकेथॉनमध्ये तब्बल ४५ संघांनी सहभाग नोंदवत इंटर्नशिप व्यवस्थापनातील विविध आव्हानांवर नाविन्यपूर्ण डिजिटल उपाय सादर केले. स्पर्धेतील उत्कृष्ट प्रकल्पांचे परीक्षण तज्ञ परीक्षकांनी केले असून , अंतिम निकालात गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , जळगावच्या ‘अल्गोनेक्स’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल अध्यक्षस्थानी होत्या. प...