जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे प्रा. रफिक जमील शेख यांचा राष्ट्रीय गौरव

“कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स व शैक्षणिक प्रशासन” क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते तुषार कपूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान

जळगाव, ता : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रा. रफिक जमील शेख यांना ‘एमिनेंट फिगर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स अँड एज्युकेशनल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन २०२६’ या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. “इन्साईट्स सक्सेस आयोजित नॅशनल प्रेस्टिज अवॉर्ड्स २०२६” सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा भव्य पुरस्कार सोहळा रॅडिसन ब्लू, नवी दिल्ली येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते तुषार कपूर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रा. शेख यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स क्षेत्रातील संशोधन, शैक्षणिक प्रशासनातील प्रभावी नेतृत्व, तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. प्रा. शेख यांनी महाविद्यालयीन व्यवस्थापन, विद्यार्थी विकास, नवोपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्तावाढ यासाठी सातत्याने केलेल्या कार्यामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

या यशामागे जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तसेच अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना प्रा. रफिक शेख यांनी व्यक्त केली. संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि कुटुंबियांचे त्यांनी आभार मानले. प्रा. रफिक जमील शेख यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जि. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण