१८ राज्यांतील ७० शहरांमधून २८४ संघ जळगावात; रायसोनीत उद्या ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.०’चा प्रारंभ

२८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा ; सलग ३० तासांच्या हॅकाथॉनमध्ये इनोव्हेशनची शर्यत

जळगाव, ता. २७ :  जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.०’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेची अंतिम फेरी उद्या, २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील विविध अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांमधील निवडक विद्यार्थी संघ सहभागी होणार असून जळगाव शहर पुन्हा एकदा नवकल्पनांच्या उत्सवाचे साक्षीदार ठरणार आहे.

महाविद्यालयाच्या मुख्य प्रांगणात नुकतेच स्पर्धेच्या पोर्टलचे उद्घाटन संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जानेवारी महिन्यात आयडिया स्क्रीनिंग प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर तज्ज्ञ समितीमार्फत गुणवत्ताधारक संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉनमध्ये देशभरातील १८ राज्यांतील ७० शहरामधून एकूण २८४ संघांनी सहभाग नोंदवला असून, सर्व संघांनी आपापले प्रॉब्लेम सोल्युशन स्टेटमेंट सादर केले होते. या सर्व प्रस्तावांचे परीक्षण करून ज्युरी मेंबरने निवड प्रक्रियेद्वारे अंतिम फेरीसाठी ४० संघाची  निवड केली असून त्यांना जी. एच. रायसोनी महाविध्यालयातील ऑफलाईन ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.०’ येथे आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा सलग ३० तासांची नॉन-स्टॉप ऑफलाईन हॅकाथॉन स्वरूपात पार पडणार आहे. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या ४० टीममध्ये देशातील नामांकित इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. यामध्ये आयआयटी मद्रास, आयआयटी नया रायपूर, पारुल युनिव्हर्सिटी, एनआयटी पुणे, चंदीगड युनिव्हर्सिटी, केएलई युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ अलाहाबाद, युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी, आयआयटी जोधपूर यांसारख्या अव्वल दर्जाच्या संस्थांच्या संघांचा सहभाग आहे.

या उल्लेखनीय प्रतिसादामुळे जळगावातील जी. एच. रायसोनी महाविध्यालयात आयोजित हॅकाथॉनला राष्ट्रीय पातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाची देशभरात दखल घेतली जात असल्याचे अधोरेखित होते. तसेच देशातील तरुणांना नाविन्यतेसाठी योग्य दिशा मिळत असून हॅकाथॉनकडे त्यांचा वाढता कल स्पष्टपणे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेली समस्या-विधाने विविध क्षेत्रांशी संबंधित होती. त्यामध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझम, हेल्थ केअर, सर्व्हिस इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, सायबर सेक्युरिटी तसेच गव्हर्नमेंट सर्व्हिसेस या क्षेत्रांचाही त्यामध्ये समावेश होता. या सर्व क्षेत्रांमध्ये संशोधन करून विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपाय सादर करत अंतिम फेरी गाठली असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविद्यालय प्रशासनातर्फे स्पर्धेसाठी अत्याधुनिक संगणकीय सुविधा, उच्चगती इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सुसज्ज प्रयोगशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तज्ज्ञ परीक्षकांकडून प्रकल्पांचे सखोल मूल्यमापन करण्यात येऊन त्यानुसार विजेत्या संघांची निवड करण्यात येणार आहे.

२८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेकडे शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्राचे लक्ष लागले असून, जळगावमध्ये नवसंशोधनाची नवी दिशा निर्माण होईल, असा विश्वास जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण