विद्यार्थी प्रकल्पातून नाविन्यपूर्ण
संशोधनाला नवी दिशा ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनास प्रारंभ
जळगाव, ता. २३ :
जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात अंतिम
वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी बहुविभागीय प्रकल्प प्रदर्शन यशस्वीरीत्या आयोजित
करण्यात आले. या प्रदर्शनात संगणक, मॅकेनिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी
विभागांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि संशोधनाधारित प्रकल्पांचे
सादरीकरण केले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी
इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, सिव्हील
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू
पवार, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद
पाटील, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ.
बिपासा पात्रा व डेटा सायन्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख
प्रा. डॉ. स्वाती पाटील हे उपस्थित होते
या उद्घाटन प्रदर्शनात मार्गदर्शन करतांना
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले
की, अंतिम वर्षातील प्रकल्प हे केवळ
अभ्यासक्रमाचा एक भाग नसून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, संशोधन
क्षमता आणि व्यावहारिक कौशल्यांचे आदर्श व्यासपीठ आहे. महाविद्यालयात या
प्रदर्शनाचे आयोजन करण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनत व
कल्पनाशक्तीचे प्रात्यक्षिक करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा असल्याचे त्यांनी
सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी
विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्प कार्याचे मूल्यमापन केले. तसेच सदर प्रदर्शनाचे
यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच.ह रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी
रायसोनी यांनी कौतुक केले
विध्यार्थ्यांचे
प्रकल्पाच्या माध्यमातून “लोकोपयोगी संशोधन”
या
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी “लोकोपयोगी संशोधन” या थीमखाली विविध नाविन्यपूर्ण
प्रकल्प सादर केले. यामध्ये हेल्थकेअर क्षेत्रासाठी प्रॉडक्टिव्ह ऍनालिटिक्स
वापरून सुपरवाईज्ड लर्निंग अल्गोरिदम, इथरियम ब्लॉकचेनवर आधारित
डिसेंटरलाइज्ड वोटिंग सिस्टीम,आयओटी सिस्टीमसाठी ब्लॉकचेन
आधारित ऑथेंटिकेशन व डेटा सुरक्षा प्रणाली, तसेच फूड
इमेजेसवरून रेसिपी जनरेशन, स्मार्ट शॉपिंग ट्रूली ऑटोमेशन,इंडक्शन फर्नेससाठी रिगेरेटिव ब्रेकिंग सिस्टीम,मॅग्नेटिक
लेव्हिटेशन कार, सोलर ट्रॅकिंग मेकॅनिझम आदी तंत्रसह विकास
केलेले प्रकल्प होते.
विद्यार्थ्यांनी
सादर केलेले हे प्रकल्प केवळ तांत्रिकदृष्ट्या नाविन्यपूर्ण नव्हते,
तर वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आणि समाजोपयोगी
असल्याचे प्रदर्शनात स्पष्ट झाले. प्रत्येक प्रकल्पाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधन कौशल्याची, नवकल्पना
क्षमता आणि व्यावहारिक अंमलबजावणीची प्रचिती दिली.
Comments
Post a Comment