जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”
१४८ प्रकल्प सादर ; विध्यार्थी करणार “कॉपीराइट डे” च्या दिवशी सर्वोत्तम प्रकल्पांची कॉपीराइट नोंद
जळगाव, ता. १६ : विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि नवकल्पनेला चालना मिळावी तसेच भविष्यातील शास्त्रज्ञ उत्तर महाराष्ट्रातून घडावेत या उद्देशाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले तसेच आंतर महाविद्यालयीन प्रकल्प प्रदर्शन स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.अॅग्रीकल्चर, लिबरल लर्निग, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, गणितीय विज्ञान, कोडिंग, सिक्युरिटी, इंडियन स्पेस रिसर्च ऑगनाईझेशनचा प्रकल्प अशा विविध विषयांना हात घालणारे प्रकल्प प्रदर्शनात विज्ञानप्रेमींना पाहता आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून सादर झालेल्या या प्रकल्पांना मान्यवरांची कौतुकाची थाप मिळाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, फार पूर्वीपासून मानव व विज्ञान यांचे घट्ट नाते आहे. विज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक शोध लावले. २१ व्या शतकात तर विज्ञानाला पर्याय नाही त्यामुळे त्याच्या शक्तीचे आकलन झालेच पाहिजे. दिवसेंदिवस विज्ञानाच्या शाखा रुंदावत चालल्या आहेत. शाळा महाविद्यालयात पुस्तकी ज्ञान न देता विज्ञानाच्या माध्यमातून दिले गेले पाहिजे. आजची पिढी शार्प आहे. दिवसेंदिवस त्यांच्या बुद्धिमत्तेत अधिक प्रगल्भशीलता येत आहे. अशा वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शनातून विध्यार्थ्यांना सतत जागृत ठेवणे व विज्ञानाबाबत उत्सुकता निर्माण करण्याची जबाबदारी रायसोनी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी घेतल्याचा आनंद व्यक्त करत महाविध्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती भावी काळात विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देणाऱ्या ठरतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, पदवी अभ्यासक्रमात
क्रेडिट गुणांकन पद्धत आली असून याचाच मागोवा घेत प्रथम वर्षातील सर्व
विध्यार्थ्यांना या “प्रोजेक्ट एक्सबिशन”च्या माध्यमातून विध्यार्थ्यांना शैक्षणिक
बँक ऑफ क्रेडिटचे दोन क्रेडीट मिळणार आहे, त्यामुळे हा उपक्रम कम्पल्सरी असूनही विध्यार्थ्यानी या
“प्रोजेक्ट एक्सबिशनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला तसेच येत्या २३
एप्रिलला आंतरराष्ट्रीय “कॉपीराइट डे” असून या दिवशी प्रोजेक्ट एक्सबिशनमध्ये
सर्वोत्तम ठरलेल्या प्रकल्पांची कॉपीराइट नोंद करून हा दिवस साजरा केला जाणार आहे.
प्रदर्शनात पूर नियंत्रण यंत्र, जलविद्युत निर्मिती, अपघात सूचक यंत्र, ध्वनीपासून वीजनिर्मिती अशा विविध वैज्ञानिक प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. या प्रकल्प प्रदर्शनाचे समन्वय प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर व प्रा. श्रेया कोगटा यांनी साधले.
तीन उत्कृष्ट “लोकोपयोगी प्रकल्प”परीक्षक पॅनेलमध्ये मॅनेजमेंट विभागातील प्रा. डॉ. विशाल राणा व प्रा. सरोज पाटील या तज्ज्ञांचा समावेश होता. मूल्यमापन करून पहिल्या १० प्रकल्पांची निवड करण्यात आली. त्यापैकी पहिले तीन प्रकल्प होते. त्यामध्ये डिंपल जितेंद्र सोनवणे या विध्यार्थिनीने ‘इलेक्ट्रिकल सर्क्युलेट टू फाईन इंटेग्रेशन फॉर्म्युला’ हा प्रकल्प बनवला होता. योगेश भानुदास भारंबे या विध्यार्थ्याने ‘मस्सेरा रेझिस्टन्स कॅल्क्युलेटर अँड मुहश्शिरा' व राहुल हटकर यांनी “लॅक्टोमीटर’ हा प्रकल्प बनवला.
Comments
Post a Comment