जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रेन्युअरशिप’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे भव्य आयोजन

इंडस्ट्री 5.0 ते एआयपर्यंत संशोधनाचा नवा अध्याय; देश-विदेशातील तज्ज्ञ, उद्योग नेते व संशोधकांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता. १६ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात “ड्रायव्हिंग स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिटिव्हनेस थ्रू डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड सस्टेनेबल इनोव्हेशन” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ५ वी आंतरराष्ट्रीय परिषद इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रेन्युअरशिप ‘आयटीई २०२६’ उत्साहात संपन्न झाली.

परिषदेचे उद्घाटन दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाले. प्रारंभी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका व परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सविस्तर प्रास्ताविक करताना संस्थेची संशोधन, इनोव्हेशन व उद्योजकता क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाटचाल अधोरेखित केली. “इनोव्हेशन आणि तंत्रज्ञान या एका नाण्याच्या दोन बाजू असून इंडस्ट्री 5.0 च्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड सर्जनशील विचारसरणीशी घालणे अत्यावश्यक आहे,  मागील चार वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी ही परिषद संशोधक, नवउद्योजक, अभियंते आणि स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरली असून यंदा तिचे पाचवे पर्व अधिक व्यापक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात पार पडत असल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला. शैक्षणिक संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यात सशक्त दुवा निर्माण करणे, युवा संशोधकांना जागतिक पातळीवरील मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देणे हे परिषदेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

रायसोनी संस्थेने आतापर्यंत ३५० हून अधिक कॉपीराइट्स व २५० पेटंट्स दाखल केले असून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व नवनिर्मितीची संस्कृती जोपासण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. टीम बिल्डिंग, क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अ‍ॅप्रोच आणि स्किल डेव्हलपमेंट या कौशल्यांचा विकास अशा परिषदांमधूनच शक्य होतो, असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून मॅजिक इन्क्युबेशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मकरंद कुलकर्णी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महाविद्यालयांच्या यशाचे मोजमाप केवळ भव्य इन्फ्रास्ट्रक्चर, आकर्षक कॅम्पस किंवा प्रवेशसंख्येवरून होत नाही, तर “महाविद्यालय किती स्टार्टअप्स निर्माण करते, त्या स्टार्टअप्समधून विद्यार्थ्यांना किती प्रत्यक्ष संधी आणि चालना मिळते, हेच खरे यशाचे मापदंड आहेत,” असे ते म्हणाले. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांमध्येच यशकथा घडतात असे नाही; जळगावसारख्या शहरांमध्येही तितकीच क्षमता, जिद्द आणि संधी उपलब्ध आहेत, असे सांगत त्यांनी स्थानिक तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. “संधी दूर शोधण्याची गरज नाही; आपल्या आसपासच भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. गरज आहे ती डोळसपणे आपल्या भागातील समस्या ओळखण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची,” विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील वास्तव प्रश्न समजून घेत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग दृष्टीकोन विकसित केला पाहिजे, तसेच महाविद्यालयांनी त्या दृष्टीने सक्षम इकोसिस्टम उभारली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.

आपल्या पुढील मार्गदर्शनात त्यांनी स्टार्टअप्स हे केवळ व्यवसाय नसून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणारे परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे स्पष्ट केले. “नवउद्योजकांनी केवळ कल्पनांवर थांबू नये, तर त्या कल्पनांना व्यवहार्य मॉडेलमध्ये रूपांतरित करून बाजारपेठेत उतरविण्याची तयारी ठेवली पाहिजे,” असे ते म्हणाले. प्रादेशिक आर्थिक परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्यात सशक्त समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयीन स्तरावरच नवकल्पना, इनोव्हेशन लॅब्स, इन्क्युबेशन सेंटर आणि मेंटरशिप नेटवर्क यांची उभारणी केल्यास विद्यार्थी ‘जॉब सीकर’ न बनता ‘जॉब क्रिएटर’ बनू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डिजिटल परिवर्तनाच्या युगात एआय, डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि क्लाऊड टेक्नॉलॉजी यांचा प्रभावी वापर करून स्पर्धात्मकता वाढविणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना धाडस, सातत्य आणि नावीन्यपूर्ण विचारसरणी अंगीकारण्याचे आवाहन केले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ज्योती जाखेटे यांनी केले. अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. विशाल राणा, प्रा. तन्मय भाले, प्रा. मुकेश अहिरराव, प्रा. श्रिया कोगटा, प्रा. मृदुला देशपांडे, प्रा. डॉ. गिरीधारी तिवारी, प्रा. डॉ. सरोज पाटील, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. रोहित साळुंखे तसेच व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी परिषदेच्या यशाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

आंतरराष्ट्रीय सहकार्य व तज्ज्ञांचे मार्गदर्शन

” मकरंद कुलकर्णी उपस्थित होते. या परिषदेला एआयएमएस आणि सनी मॉरिसविले (युएसए) यांचे शैक्षणिक सहकार्य लाभले. सिओईपी पुणे येथील प्रा. डॉ. क्षिप्रा मोघे यांनी “इंडस्ट्री 5.0 मधील डिझाईन थिंकिंगची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन करत तंत्रज्ञानाला मानवी मूल्यांची जोड देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

सनी मॉरिसविले (युएसए) येथील प्रा. डॉ. क्रिस्टोफर एम. स्कॅल्झो यांनी “इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी फॉर फ्युचर गोल्स” या विषयावर हायब्रिड पद्धतीने कार्यशाळा घेत विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग व नाविन्यपूर्ण विचारसरणीचे महत्त्व पटवून दिले. “एआय हा केवळ शब्द नसून वेगाने बदलणाऱ्या जगातील परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. पुढील २५ वर्षे भारताने विज्ञान, तंत्रज्ञान व उद्योग यांच्या संगमातून प्रगतीचे शतक घडवावे,” असे ते म्हणाले.

समारोप सत्रात इंडोनेशिया विद्यापीठाच्या डॉ. हेट्टी करुनिया तुंजुंगसारी यांनी “सस्टेनेबल इनोव्हेशन अँड ग्लोबल कन्झ्युमर बिहेवियर” या विषयावर मार्गदर्शन केले. शाश्वतता, ग्राहकांचे बदलते वर्तन आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

 

तांत्रिक सत्रे व संशोधन मंथन

परिषदेत ऑरो युनिव्हर्सिटी (सूरत), आयसीएफएआय (रायपूर), बनस्थली विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आदी नामांकित संस्थांतील संशोधकांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, उद्योजकता, एआय, ब्लॉकचेन, इंडस्ट्री 5.0, शाश्वत तंत्रज्ञान आदी विषयांवर संशोधनपत्रे सादर केली. उत्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी “बेस्ट पेपर प्रेझेंटेशन” पुरस्कार प्रदान करण्यात आले.

निवडक संशोधनपत्रे “इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्रिएटिव्ह रिसर्च थॉट्स” तसेच अन्य आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये प्रकाशनासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण