जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या भव्य टर्फवर रंगली ‘रायसोनी प्रीमियर लीग’
क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांचा जल्लोष ; “रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी जळगाव”तर्फे आयोजन
जळगाव,
ता. २४ : जी. एच.
रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या
“रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी जळगाव”तर्फे महाविद्यालयाच्या परिसरात नव्याने
उभारलेल्या अत्याधुनिक व भव्य टर्फ मैदानावर ‘रायसोनी प्रीमियर लीग’ (आरपीएल)
क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कार,
संघभावना आणि
नेतृत्वगुणांना प्रभावी चालना मिळाली.
स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, रायसोनी प्रीमियर लीग ही केवळ क्रिकेट
स्पर्धा नसून विद्यार्थ्यांमध्ये टीम बॉन्डिंग, स्पोर्ट्समॅनशिप
आणि रोटरॅक्ट स्पिरिट रुजविणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. खेळातून मैत्री, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित
होते. अभ्यासासोबत क्रीडांगणावरील सहभाग विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या
सक्षम बनवतो. अशा उपक्रमांमधून फन,
एनर्जी आणि
अविस्मरणीय क्षणांचा संगम घडतो आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला बळकटी
मिळते. तसेच, “महाविद्यालयात नव्याने विकसित करण्यात
आलेल्या अत्याधुनिक टर्फ मैदानामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जाच्या क्रीडा
सुविधांचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. अशा आधुनिक सुविधांमुळे ग्रामीण व शहरी
विद्यार्थ्यांमधील दरी कमी होऊन त्यांना स्पर्धात्मक स्तरावर स्वतःची तयारी
करण्याची संधी मिळते. संस्था शैक्षणिक गुणवत्तेसोबत क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रमांनाही
तितकेच महत्त्व देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी
करत “टीम ब्लॅक” ने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघात
सुजल परदेशी, सात्विक दीक्षित, नेहा वाणी, हुझैफा शेख, ओम भोई आणि कुमुद भारडे यांचा समावेश
होता. “टीम बेज” ने उपविजेतेपद मिळवले. या संघात मयूर यादव, वंश कांकरीया, सेजल बहेती, प्राची भवरे, आयुष म्हैसके आणि दिव्या चौधरी यांनी
उल्लेखनीय कामगिरी केली.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला
मिळाले. क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना उत्स्फूर्त
प्रोत्साहन देत संपूर्ण मैदान दणाणून सोडले. प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत
पाहायला मिळाली आणि उपस्थितांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.
या प्रसंगी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता
पाटील, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख
प्रा. डॉ. मुकुंद पाटील, सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.
डॉ. शंतनू पवार, तसेच प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा.
जितेंद्र वढदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. श्रिया कोगटा आणि रोटरॅक्ट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर उपक्रमाचे उत्कृष्ट व नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी आयोजक, प्राध्यापक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
.jpeg)


.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment