एमबीए-एमसीए सीईटी तयारीसाठी रायसोनीत मोफत ‘क्रॅश कोर्स’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सीईटी स्कोर वाढविण्यावर विशेष भर; अनुभवी प्राध्यापकांकडून आठवडाभर सखोल मार्गदर्शन
जळगाव, ता. २३ : एमबीए व एमसीए सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जी.
एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात आयोजित करण्यात
आलेल्या ‘क्रॅश कोर्स’ला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. एमबीए व एमसीए
विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला शहरातील विद्यार्थ्यांचा मोठा
प्रतिसाद लाभला.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (स्टेट सीईटी सेल) मार्फत
घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य
दिशा मिळावी या उद्देशाने हा आठवडाभराचा मोफत क्रॅश कोर्स राबविण्यात येत आहे. २३
ते २८ मार्च या कालावधीत दररोज दुपारी २ ते ४.३० या वेळेत सत्रे आयोजित करण्यात
आली आहेत.
या कोर्समध्ये लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, व्हर्बल अॅबिलिटी व रीडिंग
कॉम्प्रिहेन्शन तसेच अॅब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या विषयांवर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून
सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय परीक्षेतील प्रश्नांची सोडवणूक तंत्र, वेळेचे नियोजन, शॉर्टकट पद्धती आणि गुण वाढविण्यासाठी
आवश्यक रणनीती यावरही विशेष भर देण्यात येत आहे.
क्रॅश कोर्सच्या पहिल्याच दिवशी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सीईटी परीक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “एमबीए व एमसीए प्रवेशासाठी सीईटी स्कोर अत्यंत निर्णायक ठरतो. त्यामुळे अभ्यास करताना केवळ विषय समजून घेणेच नव्हे, तर वेग आणि अचूकता यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. नियमित सराव, मॉक टेस्ट आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सातत्याने मेहनत करण्याचे आवाहन केले.
तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मॉक टेस्टद्वारे
प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देण्यात येणार असून त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करून
वैयक्तिक मार्गदर्शनही केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कमकुवत
बाबी ओळखून त्यावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
एमबीए/एमसीए प्रवेश प्रक्रिया तसेच शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी
सीईटी स्कोर अत्यंत महत्त्वाचा असल्याने या क्रॅश कोर्सला विद्यार्थ्यांनी मोठ्या
उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. शहर व परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग
नोंदविला असून पुढील काही दिवसांत त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या पार्श्वभूमीवर या क्रॅश कोर्सच्या सुवर्णसंधीचा लाभ स्टेट
सीईटी सेलच्या परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा, असे आवाहन संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी प्रा. रफिक शेख, प्रा. डॉ. विशाल राणा व प्रा. तन्मय भाले
यांच्याशी ९८२३३३७८६२ व ९६५७७२४०८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास
वाढून ते परीक्षेत उत्तम यश संपादन करतील, असा विश्वास महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

.jpeg)


Comments
Post a Comment