जी. एच. रायसोनीत “टेक्नोरीओन - २०२६” नवकल्पनांचा जल्लोष; तरुण अभियंत्यांना राष्ट्रीय व्यासपीठ

तांत्रिक कौशल्यांचा प्रभावी आविष्कार; विविध महाविद्यालयांतील ४९६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, ३० हजारांची पारितोषिके व उत्कृष्ट नियोजनाची दाद

जळगाव, ता. २७ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात “टेक्नोरीओन – २०२६” हा राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेने यंदाही विद्यार्थ्यांच्या कल्पकता, नवोपक्रमशीलता आणि तांत्रिक कौशल्यांचा प्रभावी आविष्कार घडवून आणला. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तथा अॅकोचे प्रिन्सिपल प्रॉडक्ट मॅनेजर नितीन ब्रम्हणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल होत्या. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. चेतन चौधरी, आयटी व डेटा सायन्स विभागप्रमुख डॉ. निलेश इंगळे, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील, डेटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील तसेच प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढद्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचा काळ हा कौशल्याधारित शिक्षणाचा असून केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही. प्रत्यक्ष अनुभव, प्रयोगशीलता आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी यांची जोड असणे अत्यावश्यक आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्यासारख्या तरुण अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तंत्रज्ञानातील वेगाने होणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना सतत शिकत राहणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे ही आजची गरज आहे. “नवीन शैक्षणिक धोरण (NEP) विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना संशोधन, स्टार्टअप, नवकल्पना आणि उद्योगविश्वाशी जोडण्यावर भर देते. ‘टेक्नोरीओन’सारखे उपक्रम हे त्याचे उत्तम उदाहरण असून यामधून विद्यार्थ्यांना स्वतःचे प्रकल्प सादर करण्याची, समस्यांवर उपाय शोधण्याची आणि संघभावनेत काम करण्याची मौल्यवान संधी मिळते. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांची निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणही विकसित होतात.”

स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी नमूद केले की, “तुम्ही केलेले नियोजन, आकर्षक इनोव्हेटीव डेकोरेशन आणि उत्साहामुळे या स्पर्धेला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे दिलेले तुमचे लक्ष आणि जबाबदारीची जाणीव ही खरोखरच प्रशंसनीय आहे. हीच ऊर्जा आणि सर्जनशीलता तुमच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ली ठरेल.” तसेच त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत टीमस्पिरीट, इनोव्हेशन आणि कन्सिस्टन्सी या तीन गोष्टी आत्मसात करण्याचे आवाहन केले.

यानंतर प्रमुख पाहुणे तथा अॅकोचे प्रिन्सिपल प्रॉडक्ट मॅनेजर नितीन ब्रम्हणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, डिझाईन थिंकिंग, डेटा-ड्रिव्हन निर्णयप्रक्रिया आणि इंडस्ट्री रेडी स्किल्स यांचे महत्त्व स्पष्ट केले. “इंजिनिअरिंग म्हणजे फक्त थिअरी नव्हे, तर प्रत्यक्ष समस्यांचे नाविन्यपूर्ण समाधान शोधण्याची क्षमता आहे. स्पर्धा तुम्हाला त्या दिशेने तयार करतात,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की, महाविद्यालय दरवर्षी अशा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांचे यशस्वी आयोजन करत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यांनी महाविद्यालयात आयोजित “हॅकेथॉन” स्पर्धेचा उल्लेख करत नमूद केले की, “अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्या तांत्रिक कौशल्यांबरोबरच समस्या सोडवण्याची क्षमता आणि टीमवर्क विकसित होतो. या माध्यमातून अनेक विद्यार्थी इंडस्ट्रीसाठी आवश्यक असलेली तयारी आत्मसात करतात.”

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये विविध विभागप्रमुख आणि समन्वयकांचे मोलाचे योगदान लाभले. प्रा. डॉ. शंतनू पवार, प्रा. डॉ. चेतन चौधरी, प्रा. डॉ. तुषार पाटील, प्रा. डॉ. स्वाती पाटील, प्रा. डॉ. निलेश इंगळे, प्रा. डॉ. जितेंद्र वडदकर आणि प्रा. डॉ. मुकुंद पाटील यांनी विभागनिहाय उत्कृष्ट समन्वय साधला. तसेच प्रा. डॉ. बिपाशा पात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन यशस्वीरीत्या पार पडले. विद्यार्थी समन्वयकांनीही जबाबदारीने काम करत कार्यक्रम सुरळीत व प्रभावीपणे पार पाडला. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्व आयोजक, समन्वयक व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

 

तांत्रिक कौशल्यांचा व्यापक आविष्कार

टेक्नोरीओन – २०२६” अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये “कनेक्ट इट”, “एबीसी क्विज”, “चॉप स्ट्रक्चर”, “ब्रिज बिल्डर”, “पेपर फ्लाईट”, “टर्फ क्रिकेट”, “इलेक्ट्रॉमेज (बझ द वायर)”, “क्रॅक द सर्किट”, “इलेक्ट्रॉनिक्स सिम्युलेटर मिनी”, “गेस द लोगो – टेक एडिशन” तसेच “टेक स्कॅव्हेंजर” या स्पर्धांचा समावेश होता.

या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, एम्बेडेड सिस्टीम्स, प्रोग्रामिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि प्रोजेक्ट एक्झिक्युशन यांसारख्या क्षेत्रांतील आपली कौशल्ये प्रभावीपणे सादर केली.

या विद्यार्थ्यांनी मिळविले यश :

“टेक्नोरीओन 2K26” अंतर्गत विविध स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले —

टेक स्कॅव्हेंजर :

विजेते – जयेश मराठे व समूह (केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

उपविजेते – विपुल शिंदे व समूह (केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

ब्रिज बिल्डर :

विजेते – नीरज बी. मोरे (गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

उपविजेते – भावेश सुपे (गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

पेपर फ्लाईट :

विजेते – यश धनगर (गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

उपविजेते – दुर्गेश चौधरी (केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

गेस द लोगो :

विजेते – आदित्य मोहाडकर (केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

उपविजेते – प्रफुल वाघ (आर.एस.सी.ई., बुलढाणा)

इलेक्ट्रॉमेज :

विजेते – दुर्गेश पाटील (एस. एस. पाटील, चोपडा)

उपविजेते – श्रेया बाविस्कर (एस. एस. पाटील, चोपडा)

कनेक्ट इट :

विजेते – वृषभ लाखे (पद्मश्री व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

उपविजेते – अथर्व लाडवंजरी (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, जळगाव)

एबीसी क्विझ :

विजेते – प्रफुल वाघ (आर.एस.सी.ई., बुलढाणा)

उपविजेते – चेतन कोळी (पद्मश्री व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

टर्फ क्रिकेट :

विजेते – दुर्गेश चौधरी व समूह (केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव)

उपविजेते – विरेंद्र व समूह (जे.टी.एम., फैजपूर)

या सर्व विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांचे महाविद्यालयाकडून अभिनंदन करण्यात आले.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रतिक्रिया

दुर्गेश पाटील, सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, चोपडा : टेक्नोरीओन – २०२६ सारख्या स्पर्धेमुळे आम्हाला केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष समस्यांवर काम करण्याची संधी मिळाली. या उपक्रमातून आमच्यातील विश्लेषणात्मक विचार, टीमवर्क आणि वेळेचे नियोजन या कौशल्यांचा विकास झाला. अशा स्पर्धा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून भविष्यातही यांचे आयोजन व्हावे,”  

यश धनगर, प्रथम वर्ष अभियांत्रिकी (ई.एन.टी.सी.), गोदावरी कॉलेज, जळगाव “‘टेक्नोरीओन – २०२६’ सारख्या तांत्रिक स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे मला नवीन गोष्टी शिकण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्तम संधी मिळाली. या उपक्रमामुळे माझ्या तांत्रिक ज्ञानात भर पडली तसेच टीममध्ये काम करण्याची आणि समस्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित झाली. अशा स्पर्धा आमच्यासारख्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतात,” 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण