जी. एच. रायसोनी महाविद्यालयात अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे संशोधनात्मक सादरीकरण
एआय, सायबर सुरक्षा, स्मार्ट ऊर्जा, ईव्ही, रोबोटिक्ससह विविध तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांचे प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले कौतुक
जळगाव, ता. २९ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ
इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे
अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ‘प्रोजेक्ट प्रेझेंटेशन’
उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध अभियांत्रिकी विभागांतील विद्यार्थ्यांनी
आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन व
नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी
आपल्या प्रकल्पांमधून प्रत्यक्ष जीवनातील विविध समस्या सोडविण्यासाठी
तंत्रज्ञानाधारित उपाययोजना मांडल्या.
या
प्रदर्शनाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.
डॉ. शंतनू पवार, मॅकेनिकल
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. बिपासा पात्रा, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ.
चेतन चौधरी, इलेक्ट्रॉनिक्स
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील, डेटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील
तसेच सर्व प्राध्यापक व
विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सर्व विभागप्रमुखांसोबत प्रकल्प प्रदर्शनाची पाहणी
केली. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेत
त्यांनी त्यांच्या संशोधनात्मक दृष्टिकोनाचे, नाविन्यपूर्ण
संकल्पनांचे आणि तांत्रिक कौशल्यांचे कौतुक केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की, “अंतिम वर्षातील प्रकल्प हे केवळ अभ्यासक्रमाचा एक भाग नसून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, संशोधन क्षमता आणि व्यावहारिक कौशल्यांना दिशा देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष प्रकल्पाच्या माध्यमातून साकारताना त्याचा समाज व उद्योगविश्वाला कसा उपयोग होईल, याचाही विचार करणे आवश्यक आहे.” विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे व कल्पनाशक्तीचे प्रात्यक्षिक करण्याची संधी अशा प्रदर्शनातून मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एआय आणि मशीन
लर्निंगवर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण
आर्टिफिशियल
इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांनी ‘एआय-ड्रिव्हन स्मार्ट
टिकटिंग अँड कस्टमर सपोर्ट सिस्टम’, ‘रिअल-टाइम
साइन लँग्वेज इंटरप्रिटर’, ‘सायबरसेंटिनेल
: रिअल-टाइम स्कॅम डिटेक्शन अँड इन्सिडेंट व्हिज्युअलायझेशन’, ‘मेडफ्लो एआय
: इंटेलिजंट मेडिसिन सप्लाय चेन अँड हॉस्पिटल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’, ‘अॅग्रीगुरू :
एआय बेस्ड स्मार्ट अॅग्रीकल्चर डिसिजन सपोर्ट सिस्टम’, ‘एआय लीगल अॅडव्हायझर’
आदी प्रकल्प सादर केले.
संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी एआय-पॉवर्ड कॉर्पोरेट कार्बन फूटप्रिंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म, स्मार्ट हॉस्पिटल मॅनेजमेंट, व्हेईकल पार्किंग मॅनेजमेंट, एआय-पॉवर्ड डेव्हऑप्स इन्सिडेंट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म, स्मार्ट सोलर ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म यांसारख्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.
स्मार्ट
ऊर्जा, ईव्ही आणि
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रकल्प
इलेक्ट्रिकल
अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी स्मार्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन विथ
डायनॅमिक लोड बॅलन्सिंग, सोलर पीव्ही
पॉवर फोरकास्टिंग, स्मार्ट
ईव्ही बॅटरी मॅनेजमेंट अँड हेल्थ मॉनिटरिंग, डिजिटल रेल
इन्स्पेक्शन अँड स्ट्रक्चरल हेल्थ ट्रॅकिंग, रिअल-टाइम
पॉवर क्वालिटी मॉनिटरिंग यांसारखे प्रकल्प सादर केले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी लोरा प्लस जीएसएम ड्युअल-मोड इमर्जन्सी वॉच, वेअरेबल रिअल-टाइम हेल्थ मॉनिटरिंग, आयओटी-आधारित स्मार्ट अटेंडन्स व अॅक्सेस कंट्रोल, स्मार्ट अॅग्रीकल्चर, होम एनर्जी यूज ऑप्टिमायझर, आरएफआयडी-आधारित ऑटोनॉमस कॅम्पस डिलिव्हरी ट्रॉली आदी प्रकल्प मांडले.
मॅकेनिकल
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कार्यक्षम प्रकल्प
मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी टाटा नॅनोचे ई-कार्ट लोडरमध्ये रूपांतर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेकिंग सिस्टम, सोलर पॉवर्ड लॉन मॉवर, सोलर डिहायड्रेटर विथ थर्मल हीट बॅकअप, ऑटोमॅटिक वायर कटर, ऑटोमेटेड सीडिंग अँड इरिगेशन सिस्टम, मोटराइज्ड स्टेअरकेस क्लायम्बिंग ट्रॉली आणि पिक-अँड-प्लेस रोबोटिक आर्म यांसारखे प्रकल्प सादर केले.
डेटा
सायन्समधून एआय आधारित उपाययोजनांना चालना
डेटा सायन्स
विभागातील विद्यार्थ्यांनी इंटेलिजंट डिसिजन सपोर्ट सिस्टम, रिअल इस्टेट प्राइस प्रेडिक्शन, मल्टी-एजंट एआय ब्लॉग जनरेशन सिस्टम, एआय-आधारित विद्यार्थी प्लेसमेंट
प्रेडिक्शन व करिअर रेकमेंडेशन, स्मार्ट
स्टडी प्लॅनर, डायनॅमिक
करिअर इंटेलिजन्स सिस्टम, सोशल मीडिया
सेंटिमेंट अँड ब्रँड अॅनालिटिक्स, विद्यार्थी
कामगिरी विश्लेषण, एआय रिसर्च
पेपर रिव्ह्यूअर आणि रेझ्युमे स्क्रीनिंग सिस्टम यांसारख्या प्रकल्पांचे सादरीकरण
केले.
या
प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ
थिंग्ज, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, स्मार्ट ऊर्जा, ई-मोबिलिटी, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध
क्षेत्रांतील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या
संशोधनवृत्तीला, नवोन्मेषी
विचारांना आणि व्यावहारिक कौशल्यांना चालना मिळत आहे.
महाविद्यालयातर्फे
अशा प्रकल्पाधारित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये, संशोधनाची दृष्टी आणि तंत्रज्ञानाच्या
प्रत्यक्ष वापराचा अनुभव देण्यावर भर दिला जात आहे. अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी
यांनीही विद्यार्थ्यांच्या या संशोधनात्मक उपक्रमाचे कौतुक केले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment