जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये ‘एआय फॉर भारत’ हॅकाथॉन
शहरातील विविध शाळांमधील १३ संघांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण विचार आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन
जळगाव, ता. २९ : जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, सावखेडा शिवार, जळगाव येथे ‘एआय फॉर भारत – इंटरस्कूल
हॅकाथॉन २०२६’ या आंतरशालेय हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले. यंदा या उपक्रमाचे दुसरे
वर्ष असून, दोन स्तरांमध्ये एकूण १३ संघांनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये लेव्हल १ मध्ये पाच, तर लेव्हल २ मध्ये आठ संघ सहभागी झाले.
लेव्हल १ मध्ये ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, जळगावच्या निधी पाचपांडे, खुशी पाटील, आर्या जोशी आणि गुंजन पाटील यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ₹५ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या कौस्तुभ पंकज साळुंखे, एरन निशिकांत माधवानी आणि हृदय हर्षल सोनवणे यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. या संघाला ₹३ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
लेव्हल २ मध्येही ओरियन सीबीएसई
इंग्लिश मीडियम स्कूल, जळगावच्या शुभम राजेश फेगडे, युगल कमलेश झिंझुवाडिया, अश्मित प्रसन्न पाचपांडे आणि आदित्य
प्रदीप सोलंकी यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. या संघाला ₹५ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, वावडदेच्या मोहिल रविंद्र महाजन, आरजू अल्ताफ शेख, ओम
सचिन पाटील आणि वैष्णवी महेंद्र वाणी यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या
संघाला ₹३ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी
सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण विचार, तांत्रिक कौशल्य, टीमवर्क आणि समस्या सोडविण्याची क्षमता
यांचे प्रभावी प्रदर्शन केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध समस्यांवर
नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली.
या उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका
क्रिस्टाबेल परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे परीक्षण श्री. तुषार वाघ आणि
श्री. चेतन चौधरी यांनी केले. तसेच शाळेच्या संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी
सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण विचारांना आणि तांत्रिक
कौशल्यांना प्रोत्साहन दिले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी
शाळा, विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, परीक्षक, मेंटर्स आणि आयोजन समितीचे मनःपूर्वक आभार मानण्यात
आले. सर्व विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील
शैक्षणिक व नवोन्मेषी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


.jpeg)



Comments
Post a Comment