जी. एच. रायसोनी स्कूल व महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन, निबंध–वक्तृत्व स्पर्धा आणि बहुभाषिक प्रस्ताविकेच्या वाचनातून विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल व्यक्त केला आदर
महाविध्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच.
रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या मार्गदर्शक म्हणून
उपस्थित होत्या. अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व एनएसएस समन्वयक प्रा. अमोल
जोशी यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
प्रमुख
मार्गदर्शिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी संविधान दिन हा प्रत्येक भारतीयासाठी
अभिमानाचा दिवस असल्याचे सांगितले. विविध धर्म–संस्कृतींच्या १४० कोटी लोकसंख्येला
एकत्र बांधणारे सामर्थ्य भारतीय संविधानात असल्याचे त्यांनी नमूद केले. मूलभूत
अधिकार,
कर्तव्ये, शासनसंस्था व नागरिकांचे
स्वातंत्र्य याबद्दल त्यांनी रोचक उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
केले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक
वाचन करून उद्देशिकेचे पालन करण्याची शपथ घेतली.
संविधान
दिनानिमित्त आयोजित निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने
सहभाग नोंदवला. विजेत्यांसह सर्व स्पर्धकांचे कौतुक प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व
प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना
संविधानावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला.
दरम्यान,
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, सावखेडा येथेही
संविधान दिन औत्सुक्याने साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा
यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी,
मराठी, हिंदी आणि संस्कृत या चार भाषांमध्ये
प्रस्ताविकेचे वाचन करून संविधानिक आदर व्यक्त केला. दुष्यंत पाटील यांनी
प्रस्ताविकेतील शब्दांचे अर्थ व महत्त्व समजावून सांगत विद्यार्थ्यांना
राज्यघटनेची मूलतत्त्वे शिकवली.
या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग व सहकार्य केले. स्कूलच्या संचालिका सौ. पलकजी रायसोनी यांनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्कूल व महाविद्यालयात आयोजित केलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांची जपणूक, आदर, आणि प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Comments
Post a Comment