जी. एच. रायसोनी महाविध्यालयात एसटीसार्कची मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह; ५ विद्यार्थ्यांची उच्च वेतन पॅकेजसह निवड

१६ जणांना इंटर्नशिप व प्री-प्लेसमेंट ऑफर ; सलग होत असलेल्या निवडींमुळे आनंदाचे वातावरण - ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचा उपक्रम

जळगाव, ता. २२  : स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निवड होत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे विद्यार्थी तांत्रिक, सॉफ्ट स्किल्स व इंडस्ट्री-ओरिएंटेड ट्रेनिंगच्या जोरावर रोजगारक्षम होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

याच अनुषंगाने एसटीसार्क (सहजानंद टेक्निकल सर्व्हिसेस अँड रिसर्च सेंटर प्रा. लि., पुणे/नाशिक) या कंपनीतर्फे आयोजित कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये बी.टेक (सीएसई, डीएस, एआय, एआयएमएल, आयटी) शाखांच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी एकूण ११२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर ५२ विद्यार्थी टेक्निकल व एचआर मुलाखतींना उपस्थित राहिले.

यापैकी १६ विद्यार्थ्यांची इंटर्नशिप व प्री-प्लेसमेंट ऑफरसाठी, तर ५ विद्यार्थ्यांची ५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर निवड करण्यात आली. वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निरज नवल जांबरे (एआयएमएल), ओंकार अभय ढोले (सीएसई), पुणम शरदकुमार पाटील (एआयएमएल), कार्तिक दिनेश चौधरी (सीएसई) आणि कल्पेश धीरज बोराडे (सीएसई) या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कॅम्पस इंटरव्ह्यू प्रक्रियेदरम्यान जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या, “आजच्या जागतिक स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर उद्योगक्षेत्राला आवश्यक त्या कौशल्यांनी स्वतःला सिद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आमच्या संस्थेचे विद्यार्थी उत्तम करिअर घडवत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. उद्योगक्षेत्राला कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आवश्यक असतात याचा सखोल अभ्यास करून आम्ही आमची शिक्षण प्रणाली पूर्णपणे स्कील-बेस्ड मॉडेलकडे वळवली आहे. औद्योगिक गरजेनुसार नवीन कौशल्याधारित अभ्यासक्रम, जॉब-रेडी मॉड्युल्स, लाइव्ह प्रोजेक्ट्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग यावर विशेष भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना उद्योगमानक कौशल्ये आत्मसात करता यावीत म्हणून अनुभवी उद्योगतज्ज्ञ, तज्ञ प्रशिक्षक आणि कॉर्पोरेट ट्रेनर्सकडून प्रोफेशनल ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, इंडस्ट्री 4.0 बेस्ड कौशल्य प्रशिक्षण प्रदान केले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून इंडस्ट्रिअल व्हिजिट्स, इंटर्नशिप ड्राइव्ह्स, कॅम्पस-टू-कॉर्पोरेट प्रोग्राम्स सातत्याने राबवले जातात. आमचे ध्येय विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवणे नसून, त्यांना उद्योगक्षम, इनोव्हेटिव्ह, बहुपयोगी व जागतिक करिअरसाठी सज्ज करणे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचे उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाचे समन्वय ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. डॉ. गिरीधारी तिवारी यांनी प्रभावीपणे पार पाडले. तसेच सहभागी व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण