जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

भावी करिअरची दिशा दाखवणारा उपक्रम ; विविध क्लासेस व शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव : जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी, योग्य विषय निवडीचे महत्त्व आणि स्पर्धात्मक परीक्षांची दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. संदीप पाटील यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या जबाबदारी पार पाडली. तसेच प्रा. नैना चौधरी, प्रा. प्रियंका मल, प्रा. निकिता कौरानी, प्रा. शीतल किनगे, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. अभिषेक सुरैया, प्रा. नेहा लुनिया, प्रा. राहुल यादव आणि प्रा. मीनाक्षी पाटील यांनी विविध विषयांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात जळगाव शहरातील विविध क्लासेस व स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.अनिल सोनार आणि श्री.संतोष मिसाळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाचे कौतुक करताना जी. एच. रायसोनी इस्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन व शिक्षकांचा सहभाग हा समाजासाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले.

आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी मार्गदर्शक दिशा मिळाली.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण