जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “उर्जयती-२०२५” : दिग्गज उद्योजकांचा संवाद व नवउद्योजकतेला नवी उर्जा
एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत ५ दिवसांचे वर्कशॉप अॅन्ड बूट कॅम्प : फॅमिली बिझनेस, स्टार्टअप्स आणि उद्योजकतेतील आव्हानांवर उपाय व संधींचा व्यापक आढावा
कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात कोगटा
ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रेम कोगटा, विनले पॉलिमर्सचे संचालक पोरस संचेती, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन
प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए
विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, कार्यक्रम
समन्वयक प्रा. तन्मय भाले व प्रा. डॉ. विशाल
राणा हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले की
फॅमिली बिझनेसचा भारताच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा अत्यंत महत्त्वाचा
असून फॅमिली बिझनेस मजबूत झाला तर देशाची इकॉनॉमीही जलदगतीने विकसित होऊ शकते.
भारतासारख्या डेव्हलपिंग इकॉनॉमीत गेल्या काही वर्षांत स्टार्टअप्स, उद्योजकता आणि इनोव्हेशनला शासनाकडून मोठे
प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. जळगावसारख्या शहरातही अनेक
उद्योजकांनी स्थानिक पातळीवरून जागतिक बाजारपेठेत यशस्वी प्रवेश मिळवला असून
विद्यार्थ्यांनीही अशा यशस्वी उदाहरणांकडून प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तरुणांनी कठोर परिश्रम, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, समस्यांचे समाधान शोधण्याची वृत्ती आणि
सर्जनशीलता या गुणांचा विकास केल्यास ते नक्कीच सक्षम उद्योजक बनू शकतात—हीच
उर्जयतीची खरी प्रेरणा, असे त्यांनी
प्रतिपादन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कोगटा ग्लोबल
प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रेम कोगटा यांनी विद्यार्थ्यांना आपल्या
एंटरप्रेनरशिप जर्नी बद्दल सांगत महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. त्यांनी
सांगितले की ग्राहकांना फॅमिली मेंबर्सप्रमाणे वागवल्यास व्यवसाय दीर्घकाळ यशस्वी
राहतो. मार्केट रिसर्च, ग्राहकसंबंध
व्यवस्थापन आणि क्वालिटी मॅनेजमेंट यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. डाळ एक्स्पोर्ट
व्यवसायावर सरकारी बंदी आल्यावर त्यांनी योग्य रणनीती, ग्राहकांची गरज ओळखणे आणि कामाचे सुयोग्य
विभाजन करून पुन्हा व्यवसाय उभा केला. त्यांच्या अनुभवातून धैर्य, लवचिकता, टीमवर्क आणि ग्राहककेंद्रित दृष्टिकोन हे यशाचे मुख्य आधार असल्याचा संदेश
त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यानंतर विनले पॉलिमर्सचे संचालक पोरस संचेती
यांनी “टेक्नॉलॉजी इन फॅमिली मॅनेज्ड बिझनेस” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी
आपल्या कंपनीने विविध आव्हानांना संधींत कसे रूपांतरित केले याची उदाहरणे मांडली.
त्यांनी डिमांड–सप्लाय हा बिझनेसचा मूलभूत फॉर्म्युला कसा प्रभावीपणे वापरावा हे
स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की त्यांनी आपल्या व्यवसायात एआय
मॉडेल्सचे यशस्वी एकत्रीकरण केले असून त्यातून उत्पादनक्षमता, क्वालिटी कंट्रोल आणि व्यवस्थापन प्रक्रियेत
मोठा फायदा झाला आहे. पोरस संचेती यांनी डेटाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित करत
सांगितले की आधुनिक व्यवसायात योग्य डेटा संकलन, विश्लेषण आणि त्याचा रणनीतीत उपयोग हा दीर्घकालीन यशासाठी अत्यावश्यक आहे.
त्यांनी नव्या सॉफ्टवेअर्सच्या वापराने व्यवसाय प्रक्रिया कशा सुधारू शकतात हेही
स्पष्ट केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी सोशल मीडिया मार्केटिंगचे वाढते महत्त्व
सांगत, डिजिटल
प्लॅटफॉर्म्समुळे बिझनेस, स्पर्धा आणि
ग्राहकांशी संवाद यांची संपूर्ण रचना बदलत असून आजच्या उद्योजकांनी या माध्यमांचा
प्रभावी उपयोग करणे काळाची गरज असल्याचे नमूद केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी, वसंत सुपरशॉपीचे संचालक श्री. नितीन रैदासानी
यांनी विद्यार्थ्यांना “व्हॅल्यूज अँड एथिक्स इन बिझनेस” या महत्त्वपूर्ण विषयावर
मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव कथन करताना सांगितले
की, व्यवसायाच्या
विविध क्षेत्रांत काम करत असूनही त्यांनी नेहमीच नैतिक व्यवसाय पद्धतींना सर्वोच्च
स्थान दिले. त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील सदस्यांनीही मूल्याधिष्ठित
व्यवहाराची परंपरा जपली असून तीच परंपरा त्यांनी पुढे चालवली. व्यवसायात
प्रामाणिकपणा, योग्य किमतीत
सर्वोत्तम गुणवत्ता पुरविणे आणि ग्राहकांच्या समाधानासाठी स्वतः पुढाकार घेणे ही
दीर्घकालीन यशाची मार्ग आहेत, असे त्यांनी
स्पष्ट केले. उद्योजकतेमध्ये कठोर परिश्रम, समर्पण आणि सातत्य या मूल्यांचे महत्त्वही त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले.
यानंतर चार्टर्ड अकाउंटंट प्रीती मंडोरे
यांनी मार्गदर्शन करताना कुटुंबीय व्यवसायात महिलांची भूमिका किती महत्त्वपूर्ण
असते हे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, फॅमिली बिझनेसमध्ये महिला अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू
शकतात. त्या केवळ फायनान्स व्यवस्थित सांभाळू शकतात असे नाही, तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करणे, ग्राहकांशी प्रभावी संवाद साधणे आणि एच.आर.
व्यवस्थापन यातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असू शकतो. महिला एम्प्लॉयी मॅनेजमेंट, मोटिवेशन, टीम बिल्डिंग आणि दीर्घकालीन स्थैर्य साधण्यातही मोलाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद करत पुढे स्पष्ट केले की, कुटुंबीय व्यवसायांनी महिलांवर विश्वास ठेवला
पाहिजे कारण त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्यांचा
आणि कार्यक्षमतेचा व्यवसायाच्या प्रगतीत मोठा उपयोग होऊ शकतो. महिलांचे सहभागामुळे
फॅमिली बिझनेस अधिक सक्षम, टिकाऊ आणि
आधुनिक पद्धतीने विकसित होतो, असे प्रतिपादन
त्यांनी केले.
ता. १६ रोजी एपेक्स स्टार्टअप ग्रुपचे
संस्थापक श्री. अजिंक्य तोतला यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या “एपेक्स स्टार्टअप
ग्रुप” बद्दल सविस्तर माहिती दिली. हा ग्रुप नवउद्योजकांना कशाप्रकारे मदत करतो, कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन व कौन्सिलिंग
करतो याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या कल्पना मौलिक
असल्या, तरी त्या
योग्य दिशेने विकसित करण्यासाठी आम्ही सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले. ज्यांना स्टार्टअप किंवा नवीन बिझनेस सुरू करण्याची
इच्छा आहे, अशा
विद्यार्थ्यांना “एपेक्स स्टार्टअप ग्रुप” निश्चितच मार्गदर्शन आणि प्रेरणा देऊ
शकतो, असे त्यांनी
नमूद केले.
यानंतर अर्बन क्लॅडचे संस्थापक आणि रायसोनी
महाविध्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. अंकुर साळुंखे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद
साधताना सांगितले की, महाविद्यालयातील
अनुभवामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत मोठी मदत झाली. त्यांनी पुढे स्वतःचा
व्यवसाय कसा सुरू केला, उद्योग
क्षेत्रातील त्यांचे कार्य कसे वाढले आणि स्टार्टअप प्रवासात महाविद्यालयाकडून
कोणते मार्गदर्शन व सहकार्य मिळाले याची माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना
संदेश देताना सांगितले की, स्टार्ट छोट्या पासून करा, पण स्वप्न मोठं बघा,. बाजारपेठ समजून घेणे
अत्यंत आवश्यक आहे. स्टार्टअपमध्ये आव्हाने येतातच; मात्र ती ओव्हरकम करण्याची क्षमता हीच खरी उद्योजकाची ओळख असते. योग्य स्किल्स, सातत्य आणि धैर्य यामुळे व्यवसाय यशस्वी होऊ
शकतो असे त्यांनी यावेळी नमूद केले.
अखेरच्या सत्रात अॅस्पिरेया कन्सल्टिंगचे
संस्थापक आणि रायसोनी महावीध्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. पंकज वानखडे यांनी
विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांनी विविध एड-टेक कंपन्यांमध्ये मिळवलेला
अनुभव, स्वतःच्या
करिअरचा प्रवास आणि २०१३ पासून सुरू केलेल्या स्वतःच्या व्यवसायाविषयी
विद्यार्थ्यांना सांगितले. ते प्रोफेशनली करिअर काउन्सेलर असून अनेक
विद्यार्थ्यांना एंटरप्रेनरशिपसाठी मार्गदर्शन केले आहे. रायसोनीमध्ये शिक्षण
घेताना मिळालेल्या इंटरव्ह्यू तयारी, आयडिया पिचिंग
आदी कार्यक्रमांचा त्यांच्या उद्योजकीय प्रवासात कसा फायदा झाला हे त्यांनी
सांगितले. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना संदेश देताना त्यांनी चिकाटी, समर्पण आणि समस्या सोडवण्याची वृत्ती ही
उद्योजकतेची मूलभूत तत्त्वे असल्याचे नमूद केले.
सदर
कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान करून
त्यांना योग्य दिशादर्शक मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा. तन्मय
भाले यांनी संपूर्ण आयोजन प्रभावीपणे पार पाडले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती
जाखेटे आणि प्रा. श्रिया कोगटा यांनी उत्तमरीत्या सांभाळले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्वांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमधून अधिकाधिक व्यावहारिक ज्ञान घेण्याचे आवाहन केले.

.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment