माजी विद्यार्थ्यांमुळेच महाविद्यालयाची ओळख निर्माण होते : संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात नॉस्टेलजिया२०२५अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न ; मॅनेजमेंट व अभियांत्रिकी शाखेतील माजी विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

जळगाव, ता. १३ : विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून प्रत्येक पिढी पुढील पिढीसाठी आदर्श ठरत असते. रायसोनी इस्टीट्यूटच्या जळगाव शाखेच्या संस्थापक सदस्य म्हणून मी सन २००७ पासून आजपर्यंतच्या प्रवासाची साक्षीदार आहे. त्या वेळी अवघ्या २०० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही वाटचाल आज सुमारे ४५०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. या काळात संस्थेने सातत्याने उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करत विद्यार्थ्यांना घडविले आहे. रायसोनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समाज, उद्योगजगत तसेच विविध क्षेत्रांच्या अपेक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करत आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीतून मिळवलेले यश हेच खरे महत्त्वाचे असून त्यामुळे आई-वडील तसेच महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल होते, असे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले.

त्या जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे आयोजित नॉस्टेलजिया२०२५या कार्यक्रमांतर्गत मॅनेजमेंट व अभियांत्रिकी शाखेतील पदवी व पदव्युत्तर माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात बोलत होत्या.

प्रा. डॉ. अग्रवाल पुढे म्हणाल्या की, नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या सकारात्मक गुणांची जाणीव करून घेतली पाहिजे. व्हॉट्सॲप व फेसबुकच्या युगात अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन म्हणजे नातेसंबंध अधिक दृढ करणारा स्नेहबंधच आहे. अशा कार्यक्रमांतून प्राध्यापक, विद्यार्थी व महाविद्यालय यांचे ऋणानुबंध कायम टिकून राहतात. खानदेशातील जी. एच. रायसोनी महाविद्यालय हे मॅनेजमेंट व अभियांत्रिकी क्षेत्रातील पहिले ऑटोनॉमस महाविद्यालय असून स्वायत्त रायसोनी महाविद्यालय इनोव्हेशनच्या क्षेत्रात सातत्याने अग्रस्थानी असून इनोव्हेशन कौन्सिलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. बौद्धिक मालमत्ता अधिकार, स्टार्टअप व उद्योजकतेबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मेजरमायनर प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय व आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण दिले जात आहे. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

याप्रसंगी सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपस्थित माजी विध्यार्थ्यांचे स्वागत करत जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या विविध यशस्वी कार्याची माहिती दिली तसेच भावी आयुष्यासाठी माजी विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रायसोनी महाविद्यालयातील म्युझिक क्लब च्या विध्यार्थ्यानी विविध गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकलीत. तसेच एल्यूमनी फाउंडेशन समन्वयक प्रा.तन्मय भाले यांनी जी. एच. रायसोनी एल्यूमनी फाउंडेशनच्या विविध कार्यावर प्रकाश टाकत माजी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एल्यूमनी फाउंडेशन विविध कार्यक्रम राबवीत असल्याचे सांगितले तसेच इस्टीट्यूट व माजी विध्यार्थी कनेक्ट कसे राहतील यावरही सतत काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.पंकज रंगलानी, प्रा. गिरधारी तिवारी व सर्व विभागाचे विभागप्रमुख तसेच अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व प्राध्यापक उपस्थित होते.

माजी विध्यार्थ्यानी व्यक्त केल्या भावना

मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आपल्या जुन्या आठवणीत हरवून गेले होते. 'प्रत्येकजण आपले महाविध्यालय आता कसे आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होते. वर्ग मित्र पुन्हा भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी काहींनी महाविध्यालयात मिळालेले शिक्षण व प्राध्यापकांनी दिलेले मूलमंत्र आपल्या जीवनात किती उपयोगी येत आहेत, याचे सकारात्मक अनुभव कथन केले. तसेच आकाश व्यास,विशाल वाघानी, किरण रावलानी, साहेबान बागवान व ओम जीवनी  या माजी विध्यार्थ्यानी रायसोनी मंडी, नेटवर्क लंच, पिनेकल या सारख्या उपक्रमातून आमचा सर्वांगीण विकास होऊ शकला. त्याचप्रमाणे प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून नामवंत कंपन्यामध्ये करियर घडविण्याची व उद्योजक होण्याची संधी मिळाली असे मत त्यांनी व्यक्त केले व रायसोनी इस्टीट्यूटने या मेळाव्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल विध्यार्थ्यानी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्याजवळ इस्टीट्यूटचे आभार व्यक्त केले.

माजी विद्यार्थी मेळाव्यात टोस्टमास्टर्स क्लबचे प्रात्यक्षिक

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील टोस्टमास्टर्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण करत क्लब कसा कार्य करतो, याची प्रभावी झलक उपस्थितांना दाखवली. या प्रात्यक्षिकात टेबल टॉपिक सेशन, तयार भाषण (Prepared Speech), इम्प्रोम्प्ट स्पीच तसेच मूल्यांकन सत्र यांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून विचारपूर्वक, मुद्देसूद व सुसंगत बोलण्याची कला कशी विकसित केली जाते, हे प्रत्यक्ष दाखवून दिले. या उपक्रमामुळे नेतृत्व, संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी टोस्टमास्टर्स क्लब किती उपयुक्त आहे, हे माजी विद्यार्थ्यांना अनुभवता आले. या सादरीकरणाचे माजी विद्यार्थी, प्राध्यापक व उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व नेतृत्व कौशल्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण