“डान्स ऑफ द डिव्हाईन : रिदम्स ऑफ द
वाइल्ड” संकल्पनेवर आधारित नृत्याविष्कारातून चिमुकल्यांचा जल्लोष;
पालकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव, ता. २३ : शहरालगत असलेल्या सावखेडा
येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात
व रंगतदार वातावरणात पार पडले. यंदाचे स्नेहसंमेलन “डान्स ऑफ द डिव्हाईन : रिदम्स
ऑफ द वाइल्ड” या प्रबोधनात्मक व कलात्मक संकल्पनेवर आधारित असल्याने संपूर्ण
कार्यक्रमात दैवी ऊर्जा,
निसर्गाची लय, वन्य सौंदर्य व सांस्कृतिक वारसा
यांचे सुरेख दर्शन घडले.
या कार्यक्रमासाठी श्री. अविनाशजी
रायसोनी,
श्री. प्रदीपजी
रायसोनी,
डॉ. शेखरजी
रायसोनी,
श्री. महेंद्रजी
रायसोनी,
जी. एच. रायसोनी
इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तसेच जी. एच. रायसोनी पब्लिक
स्कूलच्या संचालिका सौ. पलकजी रायसोनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांच्या स्वागतगीत व गणेश
वंदनेने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली.
“डान्स ऑफ द डिव्हाईन : रिदम्स ऑफ द
वाइल्ड” या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकारांतून देवतांचे दैवी
नृत्य, आदिवासी व लोकनृत्य, जंगलातील लयी, प्राणी-पक्ष्यांचे भावविश्व, निसर्गाशी असलेले मानवी नाते यांचे
सशक्त सादरीकरण केले. नृत्य,
संगीत, वेशभूषा, प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत यांचा
सुरेख संगम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात
शाळेच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी शाळेच्या शैक्षणिक, कला, क्रीडा व सर्वांगीण विकासातील सातत्यपूर्ण प्रगतीचा आलेख मांडत
विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना योग्य व्यासपीठ देण्यावर भर दिला. तसेच
विद्यार्थ्यांनी शिक्षक,
आई-वडील व
समाजाबद्दल आदर व कृतज्ञता बाळगावी,
असे आवाहन करत
उत्कृष्ट व नियोजनबद्ध सादरीकरणाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
यानंतर प्रमुख पाहुण्या जी. एच.
रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात आधुनिक
तंत्रज्ञानासोबतच भारतीय संस्कृती,
मूल्ये व
निसर्गाशी नाते जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम्स यांसारख्या
आधुनिक तांत्रिक साधनांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी
दिशा देता येते,
असे त्यांनी नमूद
केले. या स्नेहसंमेलनातील सादरीकरणातून तंत्रज्ञान व संस्कृती यांचा सुंदर समन्वय
दिसून येत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा
यांनी वार्षिक अहवाल वाचनातून वर्षभरातील शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा, सण-उत्सव, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे
योगदान यांचा सविस्तर आढावा घेत उपस्थित मान्यवरांचे ऋण व्यक्त केले.
स्नेहसंमेलनाच्या शेवटी चित्रपट
गायक अमित त्रिवेदी यांनी गायलेल्या “शाम शानदार” या लोकप्रिय गीतावर सादर
झालेल्या सामूहिक नृत्याने कार्यक्रमाची अत्यंत उत्साही वातावरणात सांगता झाली. या
स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,
पालक व स्कूल
कमिटी सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व
यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी
रायसोनी यांनी स्कूलच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment