२१ डिसेंबरला रंगणार “जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी

स्पर्धेत १० महाविद्यालयांचे नाट्यप्रयोग; अंतिमला २ लाख ७५ हजारांची पारितोषिके

जळगाव, ता. १८ : ‘जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय जी. एच. रायसोनी करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार, ता. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून शिरसोली रस्त्यावरील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे संपन्न होणार आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, सोलापूर, अमरावती, अलिबाग, रत्नागिरी, कोल्हापूर व नागपूर येथील विविध महाविद्यालयांचे नाट्यसंघ सहभागी होत असून, प्रत्येक केंद्रातून निवडली जाणारी सर्वोत्कृष्ट एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

जळगाव विभागाच्या प्राथमिक फेरीत ता. २१ डिसेंबर रोजी एकूण १० महाविद्यालयांचे नाट्यसंघ सहभागी होणार असून सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सलग एकांकिका सादरीकरण होणार आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव यांचे ‘शेवटचं पत्र’, तर ११ ते १२ दरम्यान खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव यांचे ‘नो सिग्नल’ हे नाटक सादर होईल. दुपारी १२ ते १ या वेळेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचे ‘ऑल मोस्ट यू डाय’ सादर करण्यात येईल. दुपारी २ ते ३ मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव यांचे ‘भानगड’, तर ३ ते ४ एस. व्ही. के. एम. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे यांचे ‘ब्युटीपार्लर’ नाटक रंगेल. दुपारी ४ ते ५ या वेळेत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (जि. नंदुरबार) यांचे ‘मादी…’, संध्याकाळी ५ ते ६ नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांचे ‘मारुतीची जत्रा…’ आणि संध्याकाळी ६ ते ७ एस.एस.एम.एम. महाविद्यालय, पाचोरा यांचे ‘गुंता’ हे नाटक सादर होणार आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी १, , ३ व ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथे होणार असून, अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक – १ लाख ११ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक – ७१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक – ५१ हजार रुपये, तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय संघांना प्रत्येकी २१ हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. यासोबतच वैयक्तिक व इतर उत्तेजनार्थ पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा रसिकांसाठी विनामूल्य खुली असून, जास्तीत जास्त रसिकांनी व सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी करंडकच्या मुख्य समन्वयिका मृणाल नाईक व त्यांच्या टीमच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी जळगाव आयोजन समिती प्रमुख बापूसाहेब पाटील यांच्याशी मो. ९१७५७५८६३० / ८००७६८४९६० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण