“जी. एच. रायसोनी करंडक” एकांकिका स्पर्धेत मुजे महाविध्यालयाची “भोरपी” प्रथम
१ ते ४ फेब्रुवारीला नागपूर येथे अंतिम फेरी; अंतिम फेरीत एकूण ₹२ लाख ७५ हजारांची पारितोषिके
जळगाव, ता. २२ :
महाविद्यालयीन युवक-युवतींच्या उत्स्फूर्त सहभागाने जी. एच. रायसोनी
स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित “जी. एच. रायसोनी करंडक” या
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मूळजी जेठा
महाविद्यालयाच्या ‘भोरपी’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला.
जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे रविवार, ता. २१ रोजी झालेल्या या प्राथमिक
फेरीत नूतन मराठा महाविद्यालय,
जळगाव यांची ‘मारुतीची जत्रा’ या
एकांकिकेने द्वितीय,
तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड
मॅनेजमेंट, जळगाव यांच्या ‘नो सिग्नल’ या
एकांकिकेला तृतीय पारितोषिक मिळाले. परीक्षक प्रशंसनीय पुरस्काराने साने गुरुजी
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (जि. नंदुरबार) यांच्या
‘मादी’ या एकांकिकेला गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन जी. एच. रायसोनी
इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक व बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री.
योगेश शुक्ल उपस्थित होते. नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून घंटानादाने स्पर्धेचे
औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना प्रा. डॉ.
प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की,
विद्यार्थ्यांमधील नाट्यकलागुणांना
प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून “जी. एच. रायसोनी करंडक” हा उपक्रम
यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. नाटकामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कल्पनाशक्ती व संवादकौशल्य विकसित
होते, जे त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त
ठरते. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध
महाविद्यालयांकडून प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी मूळजी जेठा
महाविद्यालय जळगाव,
नूतन मराठा महाविद्यालय जळगाव, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट
जळगाव व साने गुरुजी कला,
विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (जि. नंदुरबार) या चार
संघांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी
राज्यस्तरीय अंतिम फेरीत तृतीय क्रमांक मिळवलेल्या डॉ. सुरेश जी. पाटील
महाविद्यालय, चोपडा यांच्या ‘यात्रा’ या
एकांकिकेची थेट अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
नागपूर येथील नियोजित नाट्यगृहात
येत्या १, २, ३ व ४ फेब्रुवारी
रोजी अंतिम फेरी होणार असून,
प्रथम पारितोषिक ₹१ लाख ११ हजार, द्वितीय ₹७१ हजार, तृतीय ₹५१ हजार तसेच उत्तेजनार्थ प्रथम व
द्वितीय संघांना प्रत्येकी ₹२१ हजारांचे पारितोषिक दिले जाणार
आहे. यासोबतच विविध वैयक्तिक पारितोषिकेही प्रदान केली जाणार आहेत.
पारितोषिक वितरणप्रसंगी परीक्षक
श्री. योगेश शुक्ल यांनी सांगितले की,
सर्व सहभागी युवक-युवतींनी दर्जेदार
नाट्यकृती सादर करून रसिकांना मनमुराद आनंद दिला. बॅकस्टेज आर्टिस्टसह सर्व
कलाकारांचे त्यांनी विशेष कौतुक केले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल जी. एच. रायसोनी
महाविद्यालयाचेही त्यांनी अभिनंदन केले.
.jpeg)


.jpeg)

.jpeg)


Comments
Post a Comment