जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा : सरदार पटेलांना अभिवादन
“Sardar @150” उपक्रमांतर्गत ‘एक भारत – आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेने विविध उपक्रमांचे आयोजन
कार्यक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. यानंतर त्यांनी अध्यक्षस्थानावरून
मार्गदर्शन करताना सांगितले की,
“देशाच्या
एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व
आहे. त्यांच्या राष्ट्रनिष्ठा,
कणखर निर्णयक्षमता
आणि दूरदृष्टीमुळे देशाचे एकत्रीकरण शक्य झाले. त्यांनी दिलेला ‘एक भारत, मजबूत भारत’ हा संदेश आजही तितकाच
प्रेरणादायी असून तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, “राष्ट्रीय एकता दिन हा केवळ एक औपचारिक
दिवस नसून, आपल्या देशातील विविधतेतून एकता
जपण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्याचा दिवस आहे.” या प्रसंगी अकॅडमिक डीन प्रा. डॉ.
संजय शेखावत हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी सरदार पटेलांच्या कार्याचा
उल्लेख करत विद्यार्थ्यांना एकात्मतेच्या विचाराने प्रेरित राहण्याचे आवाहन केले.
या वर्षी ‘सरदार @150’
उपक्रमांतर्गत रायसोनी महाविद्यालयात शांतता, न्याय आणि सशक्त संस्था या उद्दिष्टाशी
सुसंगत विविध उपक्रमांचे आयोजन दि. ०६ ऑक्टोबर ते ३१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान
करण्यात येणार आहे. यामध्ये ‘विकसित भारत – युवा नेत्यांशी संवाद’, रील स्पर्धा आणि निबंध स्पर्धा या
उपक्रमांचा समावेश असेल. या सर्व उपक्रमांची माहिती आणि सहभाग ‘माय भारत पोर्टल’
वर नोंदविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वसीम पटेल यांनी केले, सूत्रसंचालन व समारोपाचे आभार प्रा.
अमोल जोशी यांनी मानले. तर प्रा. अक्षय पाटील आणि प्रा. सुवर्णा सराफ यांनीही
कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी
इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.


Comments
Post a Comment