“जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा बिगुल वाजला — नोंदणीसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
जळगावात रंगणार प्राथमिक फेरी ; विजेत्यांसाठी १ लाख ११ हजारांचे पहिले पारितोषिक
स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले असून, यात अव्वल ठरणाऱ्या तीन एकांकिकांना अंतिम फेरीसाठी प्रवेश
दिला जाणार आहे. अंतिम फेरी १ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नागपूर येथे रंगणार
आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील
महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल, मुख्य समन्वयिका मृणाल नाईक आणि जी. एच. रायसोनी करंडक टीम
यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी जळगाव आयोजन समिती
प्रमुख बापूसाहेब पाटील मो. ९१७५७५८६३० किंवा ८००७६८४९६० या क्रमांकांवर संपर्क
साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments
Post a Comment