युवारंग महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चौफेर स्पर्धा ; प्रहसन, वादविवाद, गायन आणि लोकसंगीत यांचा बहारदार संगम
पुरग्रस्त गावातील परिस्थिती, प्रेमविवाहामुळे कुटुंबातील कलह, मुक्त संवादामुळे जीवनाचे महत्व, आताची राजकीय परिस्थिती, शासनाच्या योजना आणि बारगळलेला विकास, सोशल मिडीयाचे दुष्परिणाम, समाज व्यवस्थेचे भिषण वास्तव आदी सामाजिक संदेश देणारे प्रयोग प्रहसन या कलाप्रकाराने सहभागी स्पर्धकांनी आजचा दिवसाची सुरूवात जल्लोषात केली. यासोबतच पाश्चिमात्य समुहगान, २१ व्या शतकातील भारत जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे का ? या वादविवाद स्पर्धेचा विषयाने झालेली जुगलबंद आजच्या युवारंग महोत्सवाचे वैशिष्टे ठरले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रंगमंच क्र. १ बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात प्रहसन हा कलाप्रकार सादर करीत असताना आजच्या जीवनात आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा खुप छान प्रयत्न प्रत्येक सहभागी संघाकडून होताना दिसून येत होते. एकुण २६ महाविद्यालयाच्या संघांनी यात सहभाग नोंदविला होता. प्रत्येक सहभागी महाविद्यालयाच्या संघांनी आपल्या कल्पकतेनुसार केलेली वेशभुषा व पारंपारिक संगीत उपस्थितांची लक्ष्य वेधून घेत होती.
रंगमंच क्रमांक २ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे पाश्चिमात्य समुहगान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्याधुनिक वाद्य साधन क्लॅप बॉक्स, गिटार तसेच पाश्चिमात्य वेशभुषा यामुळे प्रत्येक सहभागी स्पर्धक हा जिंकण्याच्या दृष्टीने आपले सादरीकरण करताना दिसून आले. ६ विद्यार्थ्यांचा १ संघ याप्रमाणे १० महाविद्यालयाच्या संघांनी यात सहभाग नोंदविला होता.रंगमंच क्रमांक ३ कवी प्रदीप सभागृहात वादविवाद ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २१ व्या शतकातील भारत जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे का हा विषय स्पर्धकांना देण्यात आला होता. सहभागी स्पर्धक अनुकुल व प्रतिकुल या प्रमाणे आपले म्हणणे सादर करीत होते. ६२ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.रंगमंच क्रमांक ४ कवी प्रेम धवन या सभागृहात चिकट कला (कोलाज) या कलाप्रकाराचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गचित्र, स्थिरचित्र व व्यक्तिचित्र हे विषय देण्यात आले. अतिशय सुंदर पध्दतीने विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. एकुण ४८ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक ५ राष्ट्र संत तुकडोजी महाराज सभागृह येथे भारतीय शास्त्रीय गायन एकल ही स्पर्धा होती एकुण १० विद्यार्थ्यांचा संघ यात सहभागी होता.
महोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये चैतन्यदायी उत्साह होता. भोजन व निवास व्यवस्था उत्तम असल्यामुळे स्पर्धक संयोजनावर समाधानी होते. युवारंग चे स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष अॅड नितीन झाल्टे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. शिवाजी पाटील, अधिसभा सदस्य प्रा. संदिप नेरकर, प्रा. मंदा गावीत, स्वप्नाली काळे, दिपक पाटील, ऋषिकेश चित्तम, विद्यार्थी विकास संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, डॉ. संजय शेखावत, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.जे.पाटील, उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे, उपप्राचार्य डॉ.प्रमोद तायडे, केसीईचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, रंगकर्मी हेमंत पाटील आदींनी युवारंग युवक महोत्सवाच्या रंगमंचावर भेटी देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.





Comments
Post a Comment