जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘खेलोत्सव-2026’ उत्साहात संपन्न

तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धांचा जल्लोष; विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण व क्रीडावृत्ती जोपासण्याचा संदेश

जळगाव, ता. २३ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘खेलोत्सव-2026’ हा क्रीडा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या महोत्सवात क्रिकेट, रस्सीखेच, टेबल टेनिस, बॅडमिंटन अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या क्रीडा कौशल्यांचा उत्कृष्ट आविष्कार घडवून आणला. स्पर्धांदरम्यान खेळाडूंनी दाखविलेल्या उत्साह, संघभावना आणि क्रीडास्पृतीमुळे संपूर्ण परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.

सदर स्पर्धेचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातील सहभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सक्षमता, शिस्त, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन तसेच संघभावना विकसित होते. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेत स्वतःचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनवावे. विजय आणि पराभव या दोन्ही गोष्टी स्वीकारत सातत्याने प्रयत्न करणे हीच खऱ्या खेळाडूची ओळख आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रजिस्ट्रार अरुण पाटील, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर, प्रा. रणजीत वाघ, प्रा. ज्ञानेश्वर न्हावी, प्रा. पंकज रंगलाणी, प्रा. सुवर्ण सराफ, प्रा. तुषार वाघ आदी उपस्थित होते.

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. क्रिकेट आणि रस्सीखेच स्पर्धांमध्ये विशेष चुरस पाहायला मिळाली, तर टेबल टेनिस व बॅडमिंटनमध्ये खेळाडूंनी कौशल्यपूर्ण खेळ सादर केला. स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य राजपूत, ओम पटेल, नेहा चौधरी, सौरव मिस्त्री, विक्रांत पवार, चैतन्य पाटील, मयूर पाटील, यश राठोड, बंडू काळे, तेजस बाविस्कर, पृथ्वीराज परदेशी आणि क्रीडा संचालक सागर सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धांचे निकाल जाहीर

क्रिकेट स्पर्धा : विजेतेपद पियुष मोरे यांच्या संघाने पटकावले. संघात दीपराज पाटील, हरीश बोरसे, यश पाटील, निशांत शर्मा आणि दिवेश पाटील यांचा समावेश होता. उपविजेतेपद नीरज भोजवानी यांच्या संघाला मिळाले. संघात अनिश कुकरेजा, आयुष वालेचा, अभी पंजाबी, मोहित वर्मा आणि सुजल ललवाणी यांचा समावेश होता.

रस्सीखेच स्पर्धा : ओम पटेल यांच्या संघाने विजेतेपद मिळविले. संघात अनुज जोक, शिव वाघ, अर्जुन फालके, शंतनु पाटील, यश बोरसे, सिद्धांत जाधव आणि गौरव राजपूत यांचा समावेश होता.

टेबल टेनिस (मुले) :प्रथम क्रमांक सुजल सोनवणे यांनी तर द्वितीय क्रमांक तेजस बाविस्कर यांनी पटकावला.

टेबल टेनिस (मुली) : नेहा चौधरी यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर स्वरदा वानरे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

बॅडमिंटन (मुले) : लक्ष्य शर्मा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर चैतन्य पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

बॅडमिंटन (मुली) : नेहा चौधरी यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर अभिश्री चव्हाण यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील सर्व विजेते आणि सहभागी खेळाडूंचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण