जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात रंगला प्रवेशोत्सव; चिमुकल्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत
पहिल्याच दिवशी आनंददायी वातावरण; गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकासाचा विश्वास
जळगाव, ता. १७ : उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच शहरालगतच्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रवेशद्वारापासून वर्गखोल्यांपर्यंत फुलांची सजावट, आंब्याच्या पानांचे तोरण, ढोल-ताशांचा गजर आणि शिक्षकांचे प्रेमळ स्वागत यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने फुलून गेला होता.
शाळेत प्रथमच दाखल झालेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर
सुरुवातीला थोडीशी भीती आणि कुतूहल दिसत होते. मात्र शिक्षकांनी केलेले औक्षण,
गुलाबपुष्प आणि
चॉकलेट देऊन केलेले स्वागत पाहून विद्यार्थ्यांचा संकोच दूर झाला आणि त्यांच्या
चेहऱ्यावर आनंद खुलला. पालकांनीदेखील शाळेतील सकारात्मक वातावरण आणि
विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी
विद्यार्थ्यांचे स्वागत करून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर
कर्मचारी, स्कूल
कमिटी सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाला
प्राधान्य
विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण न देता त्यांचा
बौद्धिक, सामाजिक,
सांस्कृतिक आणि
शारीरिक विकास घडविण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध
अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आकर्षक स्मार्ट क्लासरूम,
किड्स लायब्ररी,
आर्ट स्टुडिओ,
पपेट थिएटर, सेमी-ओलंपिक स्विमिंग पूल, आउटडोअर प्ले
एरिया, मॉन्टेसरी
टूल-बेस्ड लर्निंग, लाइफ
स्किल आणि कल्चरल ट्रेनिंग, आर्ट
इंटिग्रेटेड लर्निंग, स्पोर्ट्स
अँड फिटनेस ट्रेनिंग, अशा सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत
आहेत.
याशिवाय अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवर्ग, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती,
प्रत्येक वर्गाचे
सूक्ष्म नियोजन, नियमित
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आणि सुरक्षित, सुसज्ज कॅम्पस यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचे
वातावरण उपलब्ध होत आहे.
"भविष्यासाठी सक्षम विद्यार्थी
घडविण्याचा आमचा संकल्प"
यावेळी स्कूलच्या संचालिका पलकजी रायसोनी म्हणाल्या की, "विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक कौशल्ये आणि मूल्याधिष्ठित संस्कार देऊन त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविणे हे आमचे ध्येय आहे. रायसोनी एज्युकेशनने शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला विश्वास आणि गुणवत्ता जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्येही कायम राखली जाईल."
नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेला विश्वास यामुळे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आदर्श शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे चित्र प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.


.jpeg)

Comments
Post a Comment