जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या १५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड; आकर्षक पॅकेजसह करिअरला नवी दिशा

मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची टाटा महिंद्रा, अ‍ॅस्टेमो, कॅरारो, बजाज आणि ब्लू स्टारसह विविध आघाडीच्या कंपन्यांमध्ये निवड; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले अभिनंदन

जळगाव, ता. १६ : स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आयोजित केलेल्या निवड प्रक्रियेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आकर्षक वेतन पॅकेजसह निवड झाल्याने विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत कौशल्य, संवादकौशल्य आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यात येते. याच प्रयत्नांचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी विविध नामांकित कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत यश मिळविले आहे.

यामध्ये टाटा महिंद्रा, अ‍ॅस्टेमो, कॅरारो, केल्विन, बजाज आणि ब्लू स्टार यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये काजल बिस्वास, राज सोनवणे, मनियार फैजान फैयाज, शेख आवेस, इम्रान शेख, प्रणव कावळे, राजनंदिनी सपकाळे, ओम वैष्णव, ग्रीष्मा तयाडे, प्रसाद माळी, गौरव नाळे, चैतन्य ढेकळे, हेमांगीनी पाटील, रोहन राजपूत आणि अक्षय नेलीपांबील यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी विविध फेऱ्यांमधील लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखती आणि एचआर मुलाखती यशस्वीरीत्या पार करून ही कामगिरी केली आहे.

कौतुक समारंभात बोलताना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, "नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्याधारित शिक्षण, प्रात्यक्षिक प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, नावीन्यपूर्ण विचार आणि रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळत आहेत."

सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. डॉ. गिरीधारी तिवारी तसेच विभागप्रमुख व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जी. एच. रायसोनीच्या मेकॅनिकल, सिव्हिल व ई अँड टीसी विभागांचे १०० टक्के प्लेसमेंट

"जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबतच त्यांना रोजगारक्षम बनविण्यावर विशेष भर दिला जातो. मेकॅनिकल, सिव्हिल आणि ई अँड टीसी या विभागांतील विद्यार्थ्यांचे शंभर टक्के प्लेसमेंट होणे ही केवळ एक आकडेवारी नसून विद्यार्थ्यांची मेहनत, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या उद्योगाभिमुख शैक्षणिक धोरणाचे फलित आहे.

काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान शाखांकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल होता. मात्र आज उद्योगविश्वाच्या गरजा झपाट्याने बदलत आहेत. उत्पादन, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम, ऑटोमेशन, ऊर्जा आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कुशल अभियंत्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मेकॅनिकल, सिव्हिल आणि ई अँड टीसी या पारंपरिक अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांना देशातील नामांकित कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आमच्या विद्यार्थ्यांवर कंपन्यांनी दाखविलेला वाढता विश्वास ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम, इंटर्नशिप, प्रकल्पाधारित शिक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जात आहे. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच संवादकौशल्य, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स आणि मुलाखत कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. याच सर्वांगीण तयारीमुळे विद्यार्थी उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत. आज टाटा महिंद्रा, अ‍ॅस्टेमो, कॅरारो, बजाज, ब्लू स्टार यांसारख्या आघाडीच्या कंपन्या रायसोनीच्या विद्यार्थ्यांना संधी देत आहेत. हे यश विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधनाच्या संधी आणि उद्योगक्षेत्राशी सुसंगत कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील."

प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

संचालिका, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट, जळगाव

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण