जी. एच. रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

तंबाखू, मद्य व अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा निर्धार ; संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांचे विद्यार्थ्यांना निरोगी व जबाबदार जीवनाचा संदेश

जळगाव, ता. २६ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तंबाखू, मद्य आणि विविध अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प करत व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

यावेळी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "तरुणाई ही देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवून निरोगी, शिस्तबद्ध आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा संकल्प करावा. व्यसन हे केवळ व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचेही नुकसान करणारे आहे. शिक्षणासोबत चांगले आरोग्य, सकारात्मक विचार आणि सुदृढ चारित्र्य हीच यशस्वी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे."

त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील चुकीच्या प्रभावांपासून सावध राहण्याचे आवाहन करत आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम, योग, क्रीडा आणि सकारात्मक छंद जोपासण्याचा सल्ला दिला. तसेच व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःबरोबरच आपल्या मित्रपरिवारात आणि कुटुंबातही जनजागृती करण्याचे आवाहन केले.

यावेळी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागांचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तंबाखू, मद्य आणि अमली पदार्थांपासून कायमस्वरूपी दूर राहण्याची तसेच समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी व्यसनमुक्त भारत निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अशा समाजोपयोगी आणि जनजागृतीपर उपक्रमांचे स्वागत करत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनावे, अशा शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण