एआय व नवतंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे कौशल्य विकासासाठी ‘पिनॅकल’सारखे महोत्सव आवश्यक : सायबर पोलीस श्री. मिर्झा
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘पिनॅकल २०२६’ या राष्ट्रीय आयटी महोत्सवाचे दोन दिवसीय आयोजन; विविध महाविद्यालयांतील १२०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव, ता. २९ : आज पाचव्या औद्योगिक क्रांतीला
सुरुवात झाली असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, ब्लॉकचेन यांसारख्या अत्याधुनिक
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे, तर क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, इनोव्हेशन आणि समस्या सोडविण्याची
क्षमता विकसित होणे अत्यावश्यक आहे. ‘पिनॅकल’सारखे राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम
विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यावसायिक तयारी
वाढविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन जळगाव सायबर पोलीस
विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी केले.
ते जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विभागाच्या वतीने आयोजित ‘पिनॅकल २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील आयटी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हा महोत्सव २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सायबर पोलीस विभागातील हेड कॉन्स्टेबल दिलीप चिंचोले, आयआयएमचे प्राध्यापक डॉ. टी. प्रसाद, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, प्रा. रफिक शेख, प्रा. मुकुंद पाटील व प्रा. करिष्मा चौधरी उपस्थित होते.
प्रास्ताविकात रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत ‘पिनॅकल’ या राष्ट्रीय आयटी महोत्सवाची १८ वी आवृत्ती यावर्षी यशस्वीपणे आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवतंत्रज्ञानाची जाणीव, क्रिएटिव्ह विचारसरणी, इनोव्हेशन, कोलॅबोरेशन आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात 21st Century Skills म्हणजेच क्रिएटिव्हिटी, टीम स्पिरिट, कम्युनिकेशन व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि उद्योगाभिमुख प्रकल्पांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, प्रायोगिक स्तरावरील संकल्पनांना
प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन आणि इनोव्हेटिव्ह दृष्टिकोन आवश्यक
आहे. ‘मेक इन इंडिया’ या राष्ट्रीय संकल्पनेला बळकटी देण्यासाठी विद्यार्थ्यांनी
अधिकाधिक तंत्रज्ञानाभिमुख, समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण प्रकल्प
साकारले पाहिजेत. रायसोनी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा
राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच त्यांनी हा उपक्रम पूर्णतः
विद्यार्थ्यांचा ‘हार्ट अँड सोल’ असल्याचे नमूद करत, या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी
विद्यार्थी समन्वयकांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक केले. यासोबतच
‘पिनॅकल’ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचेही
त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
या दोन दिवसीय राष्ट्रीय आयटी महोत्सवात
आयटी क्विझ, एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, कोडिंग क्लॅश (प्रोग्रामिंग स्पर्धा), टेक रांगोळी तसेच गेम फेस्ट (BGMI,
CS, Free Fire) अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या
तांत्रिक ज्ञानासोबतच टीम स्पिरिट, कोलॅबोरेशन, सर्जनशीलता व आत्मविश्वास विकसित
होण्यावर भर देण्यात आला.
या राष्ट्रीय आयटी महोत्सवातील विविध
स्पर्धांतील विजेत्यांचे पारितोषिक वितरण प्रमुख अतिथी डॉ. राहुल अनंत कुलकर्णी
(अध्यक्ष, बोर्ड ऑफ स्टडीज इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठ) यांच्या हस्ते करण्यात आले.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी
एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, प्रा. करिष्मा चौधरी व प्रा. रफिक शेख
यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच आयोजन समितीत प्रा. मानसी तळेले, प्रा. प्रतिक्षा राजपूत, प्रा. प्रीतम पाटील, प्रा. शुभम अडवाल, प्रा. राहुल खंडारकर व प्रा. मंगेश
देओळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्पर्धेचा निकाल :
आयटी क्विझ (Battle
of Brain) स्पर्धेत
प्रथम प्रशिक अमर बोडडे व ऋषिकेश मुकेश पाटील, द्वितीय पृथ्वीराज निकम व मोहम्मद
इम्रान, तर तृतीय दिक्षा संजय इंगळे व दिपाली ज्ञानेश्वर उंबरकर यांनी
यश संपादन केले. एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग स्पर्धेत प्रथम वसंत रावत, द्वितीय ऋषी पाटील, तर तृतीय निखील मंधान (संघ) विजयी ठरले.
गेमिंग (Free Fire) स्पर्धेत प्रथम आनंद प्रभाकर बाविस्कर
अँड स्क्वॉड, द्वितीय वसीम मोहम्मद सादिक अँड स्क्वॉड तसेच तृतीय आवेश
अल्लाउद्दिन पिंजारी अँड स्क्वॉड यांनी क्रमांक पटकावले.(CS)
स्पर्धेत
प्रथम आर्यन इझाक पॉल, द्वितीय देवेंद्र राणे, खुशवंत नेरकर, हर्षल गीते, नैतिक तलरेजा व कुणाल चांदेलकर हे संघ
विजयी ठरले.
BGMI गेमिंग स्पर्धेत प्रथम राहुल सोनार, महेश कापुरे, लोकेश हुजरे व राजेश मराठे, द्वितीय चेतन जांगिड, अमन खान, ऋषिकेश कोळी व मनीष पाटील, तर तृतीय जयेश शाहपुरे, तनिष्क कुलकर्णी, मयूर जाधव व यशांक बोरसे यांनी यश
मिळविले.
टेक रांगोळी स्पर्धेत प्रथम राधिका
भगवान पाटील, द्वितीय हर्षदा संतोष पाटील, तर तृतीय जागृती प्रकाश हटकर हे विजयी ठरल्या.
तर पोस्टर प्रेझेंटेशन (UG) मध्ये प्रथम प्रतिक हिरालाल पाटील व
अनिकेत वैद्य, तर द्वितीय पूर्वा सोपान नारखेडे, भाग्यश्री अशोक नाथ, श्रावणी देविदास धुमाळ, राधिका पाटील, सोनाली मंगतसिंह व आंचल असलकल यांनी
पारितोषिके पटकावली. पोस्टर प्रेझेंटेशन (PG) मध्ये प्रथम शेख निदा आफरीन, रेनात परवीन साजिदखान व सादिया खान, द्वितीय खुशबू कांतिलाल जैन व निलेश
केवलसिंग गीरासे, तर तृतीय रमाकांत चौधरी, निखिल तायडे, रेवती पगारे, तुषार तांबटकर, ऋत्विक पाटील व साक्षी धनोर ठरले.
कोडिंग क्लॅश (प्रोग्रामिंग स्पर्धा – UG)
मध्ये
प्रथम प्रक्षिक बोबडे, द्वितीय ऋषिकेश पाटील, तर तृतीय रोहित फरकाडे यांनी यश संपादन
केले. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन
गौरविण्यात आले.


.jpeg)



Comments
Post a Comment