क्लासरूममधून थेट बाजारात : ‘विक्रीतून व्यवस्थापन’ शिकण्यासाठी रायसोनीचे २०० विद्यार्थी रस्त्यावर
तेजी हो या मंदी, खूब चलेगी ‘मंडी’ –रायसोनीच्या ‘मंडी-२०२६’ या उपक्रमाचे शहरभर कौतुक ; मार्केटमध्ये उतरली तरुण ऊर्जा
जळगाव, ता. ३० : विद्यार्थ्यांना थिअरी मीट्स प्रॅक्टिस या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे “रायसोनी मंडी २०२६” चे यशस्वी आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात एमबीएच्या २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या
अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी क्लासरूमच्या बाहेर पडत थेट स्ट्रीटवर जाऊन
प्रत्यक्ष प्रॉडक्ट सेलिंगचा अनुभव घेतला. “लर्निंग बाय सेलिंग” या संकल्पनेतून
विद्यार्थ्यांनी टॉईज व इतर वस्तूंचे मार्केटिंग केले. या विक्रीतून मिळालेला
प्रॉफिट अंडरप्रिव्हिलेज्ड चिल्ड्रनच्या एज्युकेशनसाठी कार्य करणाऱ्या एका एनजीओला
डोनेट करण्यात येणार असून, शिक्षणासोबत सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जपण्याचा हा उपक्रम ठरला.
उपक्रमाच्या
पहिल्या दिवशी प्रॉडक्ट ट्रेनिंग प्रोग्रामचे उद्घाटन स्व. ग्यानचंदजी व सदाबाईजी रायसोनी
यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आयआयएम मुंबई येथील
स्टार्टअप गाईड प्रा. डॉ. प्रसाद तिगलपल्ली, नवजीवन सुपरशॉपीचे संचालक श्री. अनिल कांकरिया, जी. एच. रायसोनी
इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल आणि एमबीए विभागप्रमुख प्रा.
डॉ. योगिता पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविकात
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की, २००८ म्हणजेच
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून “रायसोनी मंडी” हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत
आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांच्या
सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेनुसार आमचे महाविद्यालय खूप आधीपासूनच अनुभवाधिष्ठित
शिक्षणाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.
त्या
पुढे नमूद केले की, बिझनेस मॅनेजमेंट हा विषय केवळ वर्गखोलीत तत्त्वाधारित किंवा
पुस्तकी स्वरूपात शिकविण्यापुरता मर्यादित नसून,
प्रत्यक्ष बाह्य वातावरणात जाऊन विविध प्रात्यक्षिक अनुभव
घेणारा विषय आहे. रायसोनी मंडी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी “लर्निंग बाय
सेलिंग”चा प्रत्यक्ष अनुभव घेतात. यातून विद्यार्थ्यांना नेतृत्व, टीमवर्क, टार्गेट सेटिंग, नेटवर्किंग, अर्थशास्त्र, अकाउंट्स, नियोजन, निर्णय क्षमता
यासारख्या व्यवस्थापनाशी संबंधित विविध पैलू शिकता येतात.
रायसोनी
मंडी हा आमचा फ्लॅगशिप इव्हेंट असून यावर्षी त्याचे १८ वे एडिशन आहे. हा उपक्रम
बडिंग प्रोफेशनल्ससाठी डिझाइन करण्यात आला असून,
यामध्ये विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्टिसचा रिअल ब्लेंड
अनुभवायला मिळतो. विद्यार्थी क्लासरूममधून बाहेर पडून थेट स्ट्रीटवर जाऊन टॉईज
सेलिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत.
प्रा.
डॉ. अग्रवाल यांनी पुढे स्पष्ट केले की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी
केवळ अभ्यासापुरते न राहता अनुभवातून घडावेत, ग्राहकांच्या गरजा ओळखाव्यात,
उत्पादनाचे महत्त्व समजून प्रत्यक्ष बाजारात उतरावे, तसेच आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवाद कौशल्य यांसह
सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधावा. “बेहतर कमाई के लिए, बेहतर पढ़ाई” हे या
उपक्रमाचे ब्रीदवाक्य असून, या अंतर्गत मुंबई येथील एका सामाजिक संस्थेकडून सुमारे एक लाख
रुपयांच्या वस्तू खरेदी करून त्या विद्यार्थ्यांना विक्रीसाठी देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. उत्पादन विक्रीतून मिळणारा
प्रॉफिट एनजीओमार्फत गरजू व वंचित मुलांच्या शिक्षण व आरोग्यासाठी वापरण्यात येणार
असल्याची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, टीम स्पिरिट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग
स्किल्स, कॉन्फिडन्स
आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विकसित होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यानंतर
प्रा. डॉ. प्रसाद तिगलपल्ली यांनी आपल्या खास शैलीत “बेचो, बेचो, बेचो… बेच के सीखो, सिखाई बेच के सीखो, जो सीखा वही बेचो, जब-जब सीखा तुरंत बेचो, जहां सीखा वही बेचो, जितना सीखा पूरा बेचो, और जिससे सीखा उसी को बेचो” हे गीत विद्यार्थ्यांसमोर सादर
करत त्याचे सखोल विश्लेषण केले. मंडी सर म्हणून ओळखले जाणारे प्रा. तिगलपल्ली
यांनी प्रॉडक्ट ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लर्न बाय सेलिंगचे महत्त्व
पटवून दिले.
तसेच
त्यांनी नमूद केले की, जागतिक व्यावसायिक बदलांमुळे शिक्षणपद्धतीतही आमूलाग्र
परिवर्तन झाले आहे. पारंपरिक शिक्षण व नोकरीच्या चौकटीपलीकडे जाऊन आज नवनवीन
उद्योगधंदे आणि व्यवसाय उदयास येत आहेत. या नव्याने विकसित होणाऱ्या
क्षेत्रांमध्ये करिअर घडवायचे असल्यास त्या क्षेत्राशी संबंधित विषयांमध्ये पारंगत
होणे ही काळाची गरज आहे. आपली कौशल्ये आणि अभ्यासक्रम यांची योग्य सांगड घालून
शिक्षणक्रम पूर्ण केल्यास भविष्यात संबंधित क्षेत्रांमध्ये करिअरच्या असंख्य संधी
उपलब्ध होतात. तसेच उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसायाच्या कल्पना मांडणे, त्यावर काम करणे आणि
व्यवसायाचा विस्तार करणे एवढ्यापुरती मर्यादित नसून,
नाविन्यपूर्ण व जगावेगळ्या विचारातून आपले उत्पादन जागतिक
दर्जाचे व सर्वोत्तम बनवणे हेच खरे उद्योजकतेचे सार आहे, असे प्रतिपादन
त्यांनी यावेळी केले.त्यांच्या या अनोख्या सत्राचा विद्यार्थ्यांवर खोलवर प्रभाव
पडला.
यानंतर
नवजीवन सुपरशॉपीचे संचालक श्री. अनिल कांकरिया यांनी विद्यार्थ्यांसमोर हँड्स-ऑन
एक्सपीरियन्सच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की, केवळ पुस्तकी
ज्ञानावर अवलंबून राहणे पुरेसे नाही; प्रत्यक्ष काम करून, अनुभव घेऊन शिकणे हेच खरे शिक्षण आहे. व्यवसायात यश
मिळवण्यासाठी आणि सतत विस्तार साधण्यासाठी प्रॉडक्ट नॉलेज, कम्युनिकेशन स्किल्स, ट्रान्सपरन्सी आणि
इंटिग्रिटी यांचा गहन अभ्यास व सराव अत्यावश्यक आहे.
श्री.
कांकरिया यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी उतरल्यास केवळ उत्पादन विकण्यावर
लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही; ग्राहकांच्या गरजा समजून घेणे,
संवाद कौशल्य वापरून त्यांच्यासोबत विश्वासपूर्ण व्यवहार
निर्माण करणे आणि पारदर्शक व प्रामाणिक पद्धतीने व्यवहार करणे हे फार महत्वाचे
असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपक्रमाच्या
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन सेलिंग केली. यावेळी
सीए दर्शन जैन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तसेच महाविद्यालयातील माजी विध्यार्थी हर्ष
मतानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सीए दर्शन जैन यांनी सांगितले की, “बिझनेस करण्यासाठी
बुकिश नॉलेजइतकाच प्रॅक्टिकल एक्सपीरियन्स महत्त्वाचा आहे आणि तो रायसोनी
मंडीसारख्या उपक्रमातून मिळतो.” हर्ष मतानी यांनी विद्यार्थ्यांना मोटिव्हेट
करताना सेलिंग माइंडसेट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच,
क्वालिटी ऑफ वर्क आणि फिअरलेस अॅटिट्यूड विकसित करण्याचा
सल्ला दिला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मंडीच्या व्हेईकलला हिरवा झेंडा
दाखवून विद्यार्थ्यांना फ्लॅग-ऑफ करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी उपस्थित
मान्यवरांसमोर प्रत्यक्ष प्रॉडक्ट सेलिंगचे डेमॉन्स्ट्रेशनही सादर केले.
समारोप कार्यक्रमाप्रसंगी सर्वाधिक विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट्स आणि मेडल्स देऊन गौरव करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी आपले एक्सपीरियन्स शेअर केले.
या उपक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. विशाल सुनिल राणा, प्रा. डॉ. मुकेश अहिराव, प्रा. तन्मय भाले होते. तसेच प्रा. डॉ. सरोज पाटील, प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. प्राची जगवानी, प्रा. कविता पाटील, प्रा. मृदुला देशपांडे, प्रा. उदिता बिनवाल, प्रा. श्रिया कोगटा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अभिनव उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक व आयोजकांचे विशेष कौतुक केले.
रायसोनी
मंडीतील “स्टार सेलर्स” : पुरस्काराने सन्मानित

.jpeg)








.jpeg)
.jpeg)


Comments
Post a Comment