जी. एच. रायसोनी महाविद्यालयात पाच दिवसीय ‘एजेंटिक एआय’ सर्टिफिकेट कोर्सला उत्साहात प्रारंभ
एआयच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव; एजेंटिक एआय, एलएलएम आणि इंडस्ट्री-ओरिएंटेड स्किल्सचे प्रशिक्षण
जळगाव, ता.
२१ :जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील
कॉम्प्युटर अँप्लिकेशन्स विभाग, ट्रेनिंग
अँड प्लेसमेंट विभाग तसेच करिअर गाईडन्स अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेल यांच्या
संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय ‘एजेंटिक एआय प्रोग्राम’ या विशेष सर्टिफिकेट
कोर्सला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील
आधुनिक घडामोडी, एआय
एजंट्सची निर्मिती आणि प्रत्यक्ष वापर याविषयी विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान
देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्टिफिकेट कोर्सचे उद्घाटन जी. एच. रायसोनी
महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम
बुद्धिमत्ता (एआय) आणि विशेषतः एजेंटिक एआय या संकल्पनांचे वाढते महत्त्व अधोरेखित
केले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील किंवा सैद्धांतिक ज्ञानावर अवलंबून न राहता
आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे
त्यांनी नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या की, “एआय हे केवळ भविष्यातील तंत्रज्ञान नसून
ते आजच्या वर्तमानाचे वास्तव बनले आहे. विविध क्षेत्रांमध्ये एआयचा प्रभाव
झपाट्याने वाढत असून रोजगार, संशोधन,
उद्योग आणि
नवउद्योजकतेच्या असंख्य संधी या क्षेत्रातून निर्माण होत आहेत. त्यामुळे
विद्यार्थ्यांनी अशा कौशल्याधारित सर्टिफिकेट कोर्सचा जास्तीत जास्त लाभ घेत
स्वतःला तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविणे आवश्यक आहे. एजेंटिक एआयसारख्या प्रगत
विषयांचे सखोल अध्ययन, प्रॅक्टिकल
ट्रेनिंग आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे ज्ञान विद्यार्थ्यांना भविष्यात
इंडस्ट्रीमध्ये स्पर्धात्मक आघाडी मिळवून देईल.”
यावेळी त्यांनी सर्टिफिकेट कोर्ससाठी मार्गदर्शन करणारे रोहित
दास यांचे विशेष कौतुक करत, विद्यार्थ्यांना
अनुभवी इंडस्ट्री एक्स्पर्टकडून शिकण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी असल्याचे
सांगितले. “फक्त उपस्थित राहणे पुरेसे नाही, तर प्रत्येक संकल्पना समजून घेत
जिज्ञासू वृत्तीने, शिस्तबद्ध
पद्धतीने आणि संपूर्ण लक्ष केंद्रित करून हे प्रशिक्षण पूर्ण करावे. भविष्यातील
करिअरच्या दृष्टीने हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे,”
असे आवाहनही त्यांनी
विद्यार्थ्यांना केले.
या पाच दिवसीय सर्टिफिकेट कोर्समध्ये विद्यार्थ्यांना एआय
एजंट्सची डिझाईन, डेव्हलपमेंट
आणि डिप्लॉयमेंट याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच लार्ज लँग्वेज मॉडेल्स
(एलएलएम) इंटिग्रेशन, टूल
कॉलिंग, एपीआय,
प्रॉम्प्ट
इंजिनिअरिंग, एआय
वर्कफ्लो डिझाईन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांवरही मार्गदर्शन केले जाणार आहे.
याशिवाय रीअॅक्ट मॉडेल, मल्टी-एजंट
सिस्टिम्स, प्लॅनर-एक्झिक्युटर
आर्किटेक्चर आणि रिझनिंग वर्कफ्लोज यांसारख्या प्रगत एजेंटिक एआय संकल्पनांची ओळख
करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे तर हँड्स-ऑन
इम्प्लिमेंटेशनवर भर दिला जाणार असल्याने हा उपक्रम विशेष ठरणार आहे.
या प्रसंगी व्यासपीठावर मार्गदर्शक एआय एजंट डेव्हलपर श्री. रोहित दास तसेच महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वय ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे
डीन प्रा. डॉ. गिरिधारी तिवारी, कॉम्प्युटर
अप्लिकेशन्स विभागाच्या प्रमुख कल्याणी नेवे तसेच प्रा. मंगेश देओले यांच्या वतीने
करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप प्रा. डॉ. गिरिधारी तिवारी यांनी केला.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि प्रभावी वापर
करत स्वतःची कौशल्ये सातत्याने विकसित करण्याचे आवाहन केले. तसेच अशा कौशल्याधारित
उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत
होईल, असेही
त्यांनी नमूद केले.
या विशेष सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन ‘कॅपेबल.’ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले असून, उपक्रमाला एमएसएमई, स्टार्टअप इंडिया, टी.एन.व्ही. युनायटेड किंग्डम, आयएसओ, नॅसकॉम तसेच कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांची संलग्नता लाभली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री-ओरिएंटेड ज्ञान, आधुनिक एआय तंत्रज्ञानाची ओळख आणि राष्ट्रीय स्तरावरील स्किल-बेस्ड ट्रेनिंगचा लाभ मिळणार आहे. कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेटही प्रदान करण्यात येणार आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या सर्टिफिकेट कोर्समुळे विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आधुनिक संधींची ओळख होऊन त्यांच्या करिअर घडणीत मोठी मदत होईल, असा विश्वास जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनीलजी रायसोनी यांनी व्यक्त केला. तसेच उपक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.






Comments
Post a Comment