जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

पारंपरिक चित्रशैलींना आधुनिकतेची आकर्षक जोड; एकाच छताखाली असंख्य विद्यार्थ्यांनी साकारल्या देखण्या कलाकृती, राशी पाटीलच्या जिद्दीने वेधले लक्ष; मान्यवरांचे मार्गदर्शन, विजेत्यांना ३७,००० ची रोख पारितोषिके

जळगाव, ता. १७ मे : जी. एच. रायसोनी एज्युकेशनतर्फे आयोजित ‘थीम-आधारित ओपन पेंटिंग स्पर्धे’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात दि. १७ मे रोजी स्पर्धेचे पुन्हा आयोजन उत्साहात करण्यात आले. यावेळी स्पर्धकांसाठी फ्युजन थीम (एनी फॉर्म ऑफ ट्रेडिशनल पेंटिंग सच ॲज फड, वारली, मधुबनी इत्यादी विथ फ्युजन ऑफ कंटेम्पररी फॉर्म)”हा विशेष विषय देण्यात आला होता. सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आकर्षक कलाकृती साकारल्या.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वारली, मधुबनी, फड यांसारख्या पारंपरिक चित्रशैलींना आधुनिक संकल्पनांची जोड देत कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि सामाजिक भान यांचे प्रभावी दर्शन घडवले. विविध विषयांवरील चित्रांमधून संस्कृती, परंपरा आणि आधुनिक जीवनशैली यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक कलेची ओळख तर झालीच, शिवाय त्यातून नव्या विचारांना अभिव्यक्त होण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे ऍडमिशन डीन प्रा. रफिक शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अरुण पाटील होते. तसेच मानव संसाधन विभाग प्रमुख मयूर गोपाले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कला ही केवळ अभिव्यक्ती नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. तसेच पारंपरिक कलेचा वारसा जपत आधुनिकतेची जोड देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असे मार्गदर्शन केले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रकला शिक्षक दत्तात्रय गंधे व देवेंद्र कोल्हे यांनी काम पाहिले. त्यांनी स्पर्धकांच्या चित्रांचे परीक्षण करत रचना, रंगसंगती, विषय मांडणी, आशय आणि कल्पनाशक्तीच्या आधारे मूल्यमापन केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांनी कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्वही अधोरेखित केले.

स्पर्धेत ८ ते १३, १३ ते २१ आणि २१ वर्षांवरील अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ३००० ते ७००० असे एकूण ३७००० पर्यंत रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच प्रत्येक गटात प्रोत्साहनपर पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अविनाश डी. काटे (डीन व प्राध्यापक, सॅमवेद स्कूल ऑफ आर्ट, म्युझिक, व्हिज्युअलायझेशन, एंटरटेनमेंट अँड डिझाइन, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे), डॉ. मृणालिनी एस. नाईक (प्रोजेक्ट डायरेक्टर), डॉ. कृणाल महाजन, सागर पाटील, योगेश सोनार तसेच मोहन गोमासे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सर्व आयोजक, समन्वयक व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले

 

प्रेरणादायी क्षण : मुखाने चित्र रंगवत राशी पाटीलने जिंकली मने

या स्पर्धेतील सर्वांत प्रेरणादायी क्षण म्हणजे हाताने व पायाने इनॲक्टिव्ह असलेली विद्यार्थिनी राशी प्रवीण पाटील हिचा सहभाग ठरला. राशीने आपल्या मुखाच्या सहाय्याने सुंदर चित्र रंगवत स्पर्धेत प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तिची जिद्द, आत्मविश्वास आणि कलाप्रेम पाहून उपस्थित विद्यार्थी व पालक भारावून गेले. राशीची कलाकृती पाहण्यासाठी स्पर्धास्थळी सहभागी स्पर्धकांनी विशेष गर्दी केली होती. अनेक विद्यार्थ्यांनी तिच्याकडून प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण राशीने यावेळी सर्वांसमोर उभे केले.

स्पर्धेत चमकले हे विजेते”

प्रथम गट (वय वर्षे ०८ ते १३) –
प्रथम : अनघा श्रीकृष्ण वाघ,
द्वितीय : देवर्षी महेश बोरसे,
तृतीय : योजित मोहन गोमासे,
प्रथम उत्तेजनार्थ : अक्षिता प्रल्हाद पाटील,
द्वितीय उत्तेजनार्थ : देविका राजेश धूत.

द्वितीय गट (वय वर्षे १३ ते २१) –
प्रथम : अक्षय धनराज पाचपोळ,
द्वितीय : तेजस भीकन पवार,
तृतीय : सुकृती रेमभोटकर,
प्रथम उत्तेजनार्थ : प्रेक्षा योगेश तारकस,
द्वितीय उत्तेजनार्थ : रिया हेमंत तारकस.

तृतीय गट (वय वर्षे २१ पेक्षा पुढे) –
प्रथम : तांझिला ताहेर पिंजारी,
द्वितीय : कुणाल विष्णू जाधव,
तृतीय : नेहा विजय चौधरी,
प्रथम उत्तेजनार्थ : राशी प्रवीण पाटील,
द्वितीय उत्तेजनार्थ : शारदा प्रमोद जावळे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण