हॅकाथॉन स्पर्धेत जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा “प्रथम” क्रमांक

एआय-बेस्ड स्मार्ट हेल्थकेअर अँड एसओएस इमर्जन्सी सिस्टम’ प्रकल्पाची चमक; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

जळगाव, ता. १६ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हॅकाथॉन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या संघाला रु. १५,०००/- चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

स्पर्धेमध्ये आरोग्यसेवा, कृषी, स्मार्ट सिटी आणि शिक्षण या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये एकूण १० स्पर्धात्मक संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. यामध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवा क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावत आपली तांत्रिक गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सिद्ध केला.

या उल्लेखनीय यशाबद्दल जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान संपादन न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर समाजहितासाठी करण्यावर भर द्यावा. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून समाजातील वास्तविक समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश प्रेरणादायी असून भविष्यातही अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे.”

विद्यार्थ्यांनी सादर केलेला एआय-बेस्ड स्मार्ट हेल्थकेअर अँड एसओएस इमर्जन्सी सिस्टम’ हा अभिनव प्रकल्प विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. हा प्रकल्प कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असून, आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद, स्मार्ट आरोग्य सहाय्य आणि त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. समाजोपयोगी तंत्रज्ञानाची प्रभावी मांडणी, नाविन्यपूर्ण संकल्पना, तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. विजेत्या संघामध्ये अनन्या विजय जाधव, अथर्व चौरसिया, भावेश योगिराज पाटील, दामिनी धनंजय देशमुख या विद्यार्थ्यांचा समावेश होता

यावेळी विद्यार्थ्यांच्या कौतुक व सत्कार कार्यक्रमास संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. चेतन चौधरी, आयटी व डेटा सायन्स विभागप्रमुख डॉ. निलेश इंगळे तसेच अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. याप्रसंगी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण