जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा १००% निकाल; यशाची परंपरा कायम

दहावी सीबीएसई परीक्षेत उल्लेखनीय यश; नव्या शैक्षणिक धोरणानुसार इंटरडिसिप्लिनरी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

जळगाव, ता. १६ : शहरालगत सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने यंदाच्या सीबीएसई बोर्ड दहावी परीक्षेत उल्लेखनीय निकाल नोंदवत आपल्या दर्जेदार शिक्षण परंपरेला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील हे आणखी एक यशस्वी पाऊल ठरले आहे.

यंदाच्या निकालात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप उमटवली आहे. यामध्ये सौम्या काबरा व सृष्टी काबरा यांनी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. तसेच अर्श पटणी (९३%), आशिता रायसोनी (९१%) आणि श्लोक महाजन (८८%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांचा हा यशस्वी निकाल हा शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, विद्यार्थ्यांच्या चिकाटीचा आणि पालकांच्या सहकार्याचा परिणाम आहे. आमच्या शाळेत आधुनिक शैक्षणिक पद्धती, तांत्रिक शिक्षण, रोबोटिक्स, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यावर विशेष भर दिला जातो.”

शाळेमध्ये केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, क्रिएटिव्हिटी अँड व्हॅल्यू-ओरिएंटेशन विकसित करण्यावर स्कूल सातत्याने भर देत आहे.

या यशामुळे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल ही जळगावातील दर्जेदार आणि भविष्यवेधी शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून पुन्हा अधोरेखित झाली आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षासाठी प्लेग्रुप ते इयत्ता अकरावीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असून, तज्ज्ञांकडून मोफत करिअर मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पालकांनी शाळेतील सुविधा, शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व आनंद व्यक्त केला असून, भविष्यातही अशाच प्रकारे १०० टक्के उत्कृष्ट निकाल लागेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण