जी. एच. रायसोनी महाविध्यालयात ३ मे रोजी रंगणार ‘ओपन पेंटिंग स्पर्धा’

रायसोनी एज्युकेशनचा उपक्रम; ‘नेचर’ व ‘ट्रेडिशन’ या थीमवर आधारित स्पर्धा, सर्व वयोगटांसाठी संधी आणि आकर्षक रोख पारितोषिके

जळगाव, ता, २८ :  जी. एच. रायसोनी एज्युकेशनतर्फे रविवार, ३ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ‘थीम-आधारित ओपन पेंटिंग स्पर्धा’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जळगाव येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात होणार असून सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी स्पर्धकांना नेचर अराउंड अस’ किंवा द रूट्स ऑफ ट्रेडिशन’ या विषयांवर आधारित चित्र सादर करायचे आहे. पारंपरिक स्पर्धांपेक्षा ही स्पर्धा कल्पकता, विचारांची मांडणी आणि स्वतंत्र अभिव्यक्ती यांना प्रोत्साहन देणारी आहे.

स्पर्धेत तीन वयोगट ठेवण्यात आले असून ८ ते १३ वर्षे, १३ ते २१ वर्षे आणि २१ वर्षांवरील स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक गटासाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी ३००० ते ७००० पर्यंत रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक गटात दोन प्रोत्साहनपर पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रति सहभागी ५९ इतकी नाममात्र नोंदणी फी ठेवण्यात आली असून ड्रॉइंग शीट आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धकांनी स्वतःचे रंग व साहित्य आणणे आवश्यक आहे. सर्व चित्रे स्पर्धास्थळीच तयार करणे बंधनकारक असून परीक्षकांकडून मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढीस लागण्यासोबतच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ही स्पर्धा पुढील विविध कला उपक्रमांच्या मालिकेची सुरुवात ठरणार असल्याची माहिती डॉ. अविनाश डी. काटे (डीन व प्राध्यापक), सॅमवेद स्कूल ऑफ आर्ट, म्युझिक, व्हिज्युअलायझेशन, एंटरटेनमेंट अँड डिझाइन, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे डॉ. मृणालिनी एस. नाईक (प्रोजेक्ट डायरेक्टर) यांनी दिली

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन फॉर्म भरून नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. क्रुणाल महाजन (मो. ९२०९२५०५५५), अर्जुन चौधरी (मो. ९७६५७१३९०७) व मोहन गोमसे (मो. ८८८८४८१९५५) यांच्याशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण