जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलतर्फे २७ एप्रिल रोजी “उडान २०२६” नृत्य स्पर्धा ; छ. संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजन
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त भव्य नृत्य स्पर्धेची पर्वणी; सोलो व ग्रुप स्पर्धा, आकर्षक रोख पारितोषिके, विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी व इतर शाळांसाठीही सहभाग खुला
जळगाव, ता. २४ : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलतर्फे “उडान २०२६” या आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, ताल, लय आणि अभिव्यक्तीचा उत्सव अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
ही स्पर्धा इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी
खुली असून सोलो (एकल) व ग्रुप (समूह) अशा दोन प्रकारांत पार पडणार आहे. सोलो
सादरीकरणासाठी ४ मिनिटांचा, तर
समूह सादरीकरणासाठी ७ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे,
या स्पर्धेत इतर
शाळांतील विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे,
त्यामुळे ही स्पर्धा
खऱ्या अर्थाने आंतरशालेय स्तरावर रंगणार आहे.
“Cultural Beats Unleashed” या आकर्षक आणि सांस्कृतिक विविधतेला
अधोरेखित करणाऱ्या थीमवर आधारित ही स्पर्धा सोमवार, दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९
वाजल्यापासून छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, महाबळ, जळगाव येथे पार पडणार आहे. विविध
नृत्यप्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थी आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने
जिंकतील, अशी
अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्पर्धकांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांचीही घोषणा करण्यात आली
असून विजेत्यास ५,०००
रुपये, तर
उपविजेत्यास ३,०००
रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय ट्रॉफी आणि सहभाग प्रमाणपत्रे देऊन
स्पर्धकांचा गौरव करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्यांना चालना
मिळून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास स्कूलच्या संचालिका श्रीमती
पलकजी रायसोनी यांनी व्यक्त केला. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत
सहभागी व्हावे, असे
आवाहनही मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी केले आहे.
नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून इच्छुकांनी https://forms.gle/BCHYUBqY8Ce5xiin6 या दिलेल्या लिंकद्वारे लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.

.jpeg)

Comments
Post a Comment